Women Soldiers  Dainik Gomantak
देश

PM मोदींचे महिला सैनिकांना दिवाळी गिफ्ट, आता पुरुष अधिकाऱ्यांच्या बरोबरीने मिळणार सुट्ट्या

Narendra Modi Government: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सशस्त्र दलातील महिला जवानांना दिवाळीपूर्वी मोठी भेट दिली आहे.

Manish Jadhav

Narendra Modi Government Approved Rules For Leave Benefits For For Armed Forces Women Soldiers At Par Officers: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सशस्त्र दलातील महिला जवानांना दिवाळीपूर्वी मोठी भेट दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका ऐतिहासिक प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला आहे, ज्यामध्ये महिला सैनिक, सेलर्स, (नौदल) आणि एयर वॉरियर्स (वायुसेना) यांना अधिकाऱ्यांच्या बरोबरीने मातृत्व, बाल संगोपन आणि मूल दत्तक संदर्भात रजा मिळेल. आता वन रुल-ऑल रॅंक नियम लागू होईल.

समानता आणण्यासाठी नियमांचा विस्तार केला

दरम्यान, भारतीय सशस्त्र दलाच्या नवीन नियमांमुळे आता सर्व श्रेणीतील महिला कर्मचाऱ्यांमध्ये समानता आली आहे. संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे की, सेवा देणाऱ्या महिला सैनिकांच्या कौटुंबिक आणि सामाजिक समस्या लक्षात घेऊन रजेचे नियम वाढवण्यात आले आहेत. हे महिला सैनिकांना त्यांचे व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवन अधिक प्रभावीपणे संतुलित करण्यास सक्षम करेल.

सैनिकांच्या देशभक्तीने देश बळकट होईल

मंत्रालयाचे म्हणणे आहे की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार (Government) 'नारी शक्ती'ला स्वावलंबी आणि सशक्त बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आता तिन्ही सैन्यातील महिला सैनिकांना अधिकार्‍यांना समान रजा देऊन एक आदर्श बदल करण्यात आला आहे.

महिला अग्निवीरांच्या भरतीमुळे, देशाच्या जमीन, सागरी आणि हवाई सीमांचे रक्षण करण्यासाठी महिला सैनिक, सेलर्स आणि एयर वॉरियर्स यांच्या शौर्य, समर्पण आणि देशभक्तीमुळे सशस्त्र दल सक्षम होईल.

संरक्षण मंत्री म्हणाले- महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने आहेत

जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनवरुन सध्या महिला सैनिक युद्ध सीमांवर तैनात आहेत. ते आकाशातही अधिराज्य गाजवतात. सशस्त्र दलातील महिला आपला ठसा उमटवत आहेत.

2019 मध्ये भारतीय सैन्यात मिलिटरी पोलिस कॉर्प्समध्ये शिपाई म्हणून महिलांची भरती करुन एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांचा नेहमीच विश्वास आहे की, महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम केले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT