Karnataka Dainik Gomantak
देश

Karnataka: कर्नाटकात गुरांच्या मुस्लिम व्यापाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, गोरक्षकांनी हत्या केल्याचा आरोप

गोरक्षकांनी गटाने इर्दिशची हत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

कर्नाटकातील रामनगरा येथील सथानूर गावात शनिवारी सायंकाळी गुरांचे व्यापारी इर्दिश पाशा यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. गोरक्षकांनी गटाने इर्दिशची हत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सथानूर येथील रहिवासी इर्दिश पाशा हा गुरांचा व्यापार करायचा. त्याच्या हत्येनंतर, इद्रेशची हत्या पुण्यात केरेहल्ली यांच्या नेतृत्वाखालील गोरक्षक गटाने केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. पाशा गुरे घेऊन जात असताना पुनीतने त्याला अडवले आणि दोन लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पण, आपण बाजारातून जनावरे आणली आहेत, त्याची कागदपत्रेही आपल्याकडे आहेत, असे इर्दिशने स्पष्टपणे सांगितले.

पुनीतने इर्दिशवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पुनीत केरेहल्ली याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे इर्दिशच्या हत्येनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. कुटुंबीय आणि संतप्त लोक रस्त्यावर बसून न्यायाची मागणी करू लागले आहेत.

पोलिसांनी लोकांची समजूत काढत, आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

संशयित पुनीत केरेहल्ली कोण आहे?

या प्रकरणातील प्रमुख संशयितांपैकी एकाचे नाव पुनीत केरेहल्ली असे आहे, जो राष्ट्ररक्षण पडे (राष्ट्रीय संरक्षण दल) चा सदस्य आहे. केरेहल्लीसह आणखी दोन अनोळखी व्यक्तींवर कलम ३४१, ५०४, ५०६, ३२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, केरेहल्लीच्या फेसबुकवरून त्याने अनेकवेळा लाइव्ह करून गुरे वाहतूक आणि गोरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेताना दिसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT