Love Jihad | Uttar Pradesh Crime Dainik Gomantak
देश

UP Love Jihad Case: हिंदू असल्याची बतावणी करत फसवलं, लग्नानंतर सासऱ्याचीही घाणेरडी नजर; बरेलीत लव्ह जिहाद?

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये आणखी एक लव्ह जिहाद प्रकरण समोर आले आहे.

Manish Jadhav

Bareilly Love Jihad Case: उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये आणखी एक लव्ह जिहाद प्रकरण समोर आले आहे. बरेली शहरात राहणाऱ्या ब्युटी पार्लर ऑपरेटरशी एका मुस्लिम तरुणाने पहिल्यांदा मैत्री केली. त्यानंतर बंधक बनवून बलात्कार केला.

नाव आणि धर्माची ओळख लपवण्यासाठी आरोपी हातात कलव बांधून कपाळावर टिळक लावत असे. आरोपी आबिदच्या कुटुंबीयांनी पीडितेला बंधक बनवून जबरदस्तीने धर्मांतर केले.

त्यानंतर आबिदसोबत लग्न लावले. पीडितेने आता बरेलीतील सुभाष नगर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

महिला ब्युटी पार्लर चालवायची

दरम्यान, 30 वर्षीय महिला (Women) बरेलीतील भुटा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील रहिवासी आहे. ही महिला बरेली शहरात ब्युटी पार्लर चालवायची. महिलेने पोलिसांना सांगितले की, मल्हापूर गावातील एक तरुण 2018 मध्ये ब्युटी पार्लरमध्ये यायचा.

तरुण हातात कलव बांधायचा आणि कपाळाला टिळा लावायचा. त्याने आधी आपले नाव अंकित असे सांगितले होते. गोड बोलून त्याने पहिल्यांदा माझ्याशी मैत्री केली. हा तरुण ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायचा.

डिसेंबर 2018 मध्ये त्याने माझ्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. विरोध केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तेव्हा तरुणाने त्याचे नाव आबिद असून तो मुस्लिम असल्याचे सांगितले.

नजरकैदेत ठेवलं

पीडितीने पोलिसांना सांगितले की, तो मला त्याच्या घरी घेऊन गेला, तिथे तो मुस्लिम असल्याचे निष्पन्न झाले. तिथे त्याची आई, बहीण आणि इतर कुटुंबीयांनी मला एका खोलीत डांबून ठेवले. त्याने माझा मोबाईलही हिसकावून घेतला.

यानंतर त्याने बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर त्याने मानसिक आणि शारीरिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. आरोपीच्या तावडीतून बाहेर पडण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला, पण मला बाहेर पडता आले नाही. संपूर्ण कुटुंबाची माझ्यावर नजर होती.

संपूर्ण कुटुंबाचे धर्मांतर झाले

पीडितेने पुढे सांगितले की, आबिद, त्याचे वडील रजा, भाऊ आरिफ, आई बेगम आणि आबिदची मेहुणी सोनी यांनी माझे बळजबरीने धर्मांतर केले. मी विरोध केला असता आरोपींनी मला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

मी हिंदू असल्याचे सांगताच त्यांनी मला धमक्या देण्यास सुरुवात केली. यानंतर माझे धर्म परिवर्तन करुन आबिदसोबत लग्न लावले. या सर्व लोकांनी माझ्याविरोधात कट रचला. आबिदच्या वडिलांनीही माझ्या इज्जतीशी खेळण्याचा प्रयत्न केला.

'तुझे तुकडे करीन'

पीडितेने पोलिसांना पुढे सांगितले की, आबिद आणि त्याच्या कुटुंबीयांनी बरेलीतील मला करगैना येथे ओलीस ठेवले होते. साडेचार वर्षांपासून आबिद माझ्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करत होता. 20 मे 2023 रोजी मी आरोपींच्या तावडीतून सुटले. त्यानंतर बरेलीच्या एसएसपीकडे तक्रार केली.

सुभाषनगर पोलिसांनी (Police) सांगितले की, 22 मे रोजी पोलिस ठाण्यात पीडितेच्या तक्रारीवरुन आबिदसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.

बुधवारी रात्री पीडिता आणि हिंदू संघटनांच्या लोकांनी आरोपीच्या अटकेची मागणी केली. पीडितेचे म्हणणे आहे की, माझ्या जीवाला धोका आहे, आरोपी माझ्यासोबत काहीही करु शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arpora Nightclub Fire: 'बर्च क्लब'च्या मालकाचे आणखी काही कारनामे चर्चेत, 'मेझन्स रिसॉर्ट'च्या अग्निशमन 'NOC'चा गैरवापर; चौकशीतून माहिती उघड

South Goa Accident Cases: 'दक्षिणे'त अपघातांचे प्रमाण घटले, 2024 च्या तुलनेत 2025 काहीसे दिलासादायक

Sanjivani Sugar Factory: 'संजीवनी'च्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला गती, निविदा मुदत 5 फेब्रुवारीपर्यंत वाढवली; प्रकल्पासाठी 4 कंपन्यांकडून उत्सुकता

Goa Drug Case: कपड्यांखाली लपवले होते 3 कोटींचे ड्रग्स! मोपा विमानतळावरून विदेशी पर्यटकाला अटक

MI VS RCB: 6,4,6,4... नॅडिन डी क्लार्कची झुंजार खेळी, आरसीबीनं मुंबईच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास Watch Video

SCROLL FOR NEXT