Multiple Bank Accounts Disadvantage Dainik Gomantak
देश

Multiple Bank Accounts: तुमचीही आहेत एकापेक्षा जास्त बँक खाती? मग हे वाचा, अन्यथा नुकसान अटळ

Multiple Bank Accounts Disadvantage: आजच्या डिजिटल युगात बँकिंग आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. UPI, नेट बँकिंग आणि इतर डिजिटल माध्यमांद्वारे आर्थिक व्यवहार झपाट्याने वाढले आहेत.

Sameer Amunekar

Disadvantage Of Multiple Bank Accounts: आजच्या डिजिटल युगात बँकिंग आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. UPI, नेट बँकिंग आणि इतर डिजिटल माध्यमांद्वारे आर्थिक व्यवहार झपाट्याने वाढले आहेत. या सगळ्यासाठी आपल्याला बँक खातं असणं अत्यावश्यक आहे. मात्र अनेकजण एकापेक्षा जास्त म्हणजेच दोन ते तीन बँक खाती ठेवतात. ही सवय फायदेशीर वाटली तरी त्याचे काही गंभीर तोटेही आहेत.

विशेषतः जेव्हा आपण प्रत्येक बँक खात्याचं योग्यरीत्या व्यवस्थापन करत नाही, तेव्हा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता अधिक वाढते. चला तर मग पाहूया एकापेक्षा अधिक बँक खाती असण्याचे चार मुख्य तोटे जाणून घेऊया.

किमान शिल्लक न ठेवल्यास आर्थिक नुकसान

प्रत्येक बँकेचा एक नियम असतो, खाते चालू ठेवण्यासाठी एका ठराविक रकमेपर्यंत किमान शिल्लक ठेवणं गरजेचं असतं. जर तुमच्याकडे तीन बँक खाती असतील, तर प्रत्येक खात्यात ही किमान रक्कम अडकून पडते. परिणामी तुमची एकूण गुंतवणूक न वापरता बँकेतच अडकते. त्यामुळे एकच मुख्य खाते ठेवा आणि उर्वरित खात्यांमध्ये व्यवहार होत नसतील तर त्यांना बंद करा.

बँका सेवा कर आकारतात

अनेक बँका खातं न वापरल्यास किंवा किमान रक्कम न ठेवल्यास देखभाल शुल्क आकारतात. शिवाय, डेबिट कार्ड, चेक बुक, एसएमएस सेवा यासाठीही वार्षिक शुल्क आकारलं जातं. अनेक खाती असल्यास या सर्व शुल्कांचा एकत्रित बोजा तुमच्यावर पडतो.

क्रेडिट स्कोअरवर परिणाम

जर तुमचं एखादं बँक खाते निष्क्रिय असेल आणि त्यात किमान शिल्लक नसेल, तर त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होऊ शकतो. क्रेडिट स्कोअर हा कर्ज मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.जर बँकेकडून तुम्हाला ‘Defaulter’ मानलं गेलं, तर भविष्यात कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

कर भरण्यात अडचण

एकाधिक बँक खाती असल्यास आयकर विवरण सादर करताना सर्व खात्यांची माहिती योग्य प्रकारे सादर करणं आवश्यक असतं. यासाठी प्रत्येक खात्याचं स्टेटमेंट, फॉर्म 26AS तपासणं आणि त्यातील तपशील जुळवणं ही मोठी डोकेदुखी होऊ शकते. जर चुकीची माहिती दिली गेली किंवा काही खाती लपवली गेली, तर आयकर विभागाच्या रडारवर यायची शक्यता वाढते.

जेव्हा तुम्ही नोकरी बदलता, तेव्हा तुमचं पूर्वीचं पगार खातं काही महिन्यांनंतर आपोआप बचत खात्यात रूपांतरित होतं. पगार खात्याला किमान शिल्लक आवश्यक नसते, पण बचत खात्यासाठी असते. जर तुम्ही ही रक्कम न भरली तर बँक दंड आकारते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT