Chief Minister Bhupesh Baghel

 

Dainik Gomantak 

देश

'फाळणीला बापू नाही तर... : मुख्यमंत्री भूपेश बघेल

कालीचरण महाराजाच्या अटकेनंतर भूपेश बघेल सरकारने रायपूरमध्ये गांधी हमारे अभिमान (Gandhi Hamare Abhiman) कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

दैनिक गोमन्तक

छत्तीसगडमध्ये एका धार्मिक नेत्याने महात्मा गांधींवर अशोभनीय टिप्पणी केल्याचं प्रकरण चांगलंच तापलं आहे. कालीचरण महाराजाच्या अटकेनंतर भूपेश बघेल सरकारने रायपूरमध्ये गांधी हमारे अभिमान (Gandhi Hamare Abhiman) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह अनेक मंत्री, काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनी मूक मोर्चात सहभागी झाले होते. कार्यक्रमात मुख्यमंत्री भूपेश बघेल (Chief Minister Bhupesh Baghel) यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले. ते यावेळी म्हणाले, देशाच्या फाळणीला महात्मा गांधी (Mahatma Gandhi) नाहीतर मोहम्मद अली जिना (Muhammad Ali Jinnah) आणि सावरकर जबाबदार होते.

दरम्यान, मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राज्यातील सरकार गांधीजींनी दाखवलेल्या मार्गावर चालत असल्याचे देखील यावेळी त्यांनी म्हटले. तर धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडणारे गोडसे आणि सावरकरांच्या मार्गावर केंद्रातील सरकार चालत आहे. देशाच्या फाळणीला महात्मा गांधी नसून जिना आणि सावरकर जबाबदार होते, असंही ते म्हणाले. काँग्रेस नेहरु आणि गांधींच्या विचारांना कधीही तडा जाऊ देणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले. धर्म संसदेत कालीचरण महाराजला (Kalicharan Maharaj) अटक केल्याबद्दल सीएम भूपेश बघेल यांनी छत्तीसगड पोलिसांचे अभिनंदन केले. अशा व्यक्तीला राज्य पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केल्याचे देखील त्यांनी सांगितले.

काँग्रेसचा 'गांधी आमचा अभिमान कार्यक्रम'

गांधी अभिमान कार्यक्रमादरम्यान सीएम भूपेश बघेल यांनी गांधीजींना शिवीगाळ करणाऱ्या कालीचरणला अपमानास्पद कृत्य केले. दोन दिवस चाललेल्या धर्म संसदेत धार्मिक सुधारणांबाबत चर्चा व्हायला हवी होती. परंतु तिथे महात्मा गांधींचा अपमान झाला. सुभाषचंद्र बोस यांचे विचार गांधीजींपेक्षा वेगळे होते. दोघांमध्ये वैचारिक मतभेद असतानाही नेताजी बोस यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून रंगूनवरुन रेडिओद्वारे संबोधित केले असल्याची आठवण यावेळी मुख्यमंत्री बघेल यांनी दिली.

महात्मा गांधींनी सुंदरलाल बहुगुणा यांना आपला धार्मिक नेता म्हटले होते. गांधींनी नेहमीच श्रमिक आणि कष्ट करणाऱ्यांचा आदर केला. स्वामी विवेकानंदांनी शिकागो धर्म संसदेत सांगितले होते की, आम्ही जगातील सर्व धर्म स्वीकारतो. छळ झालेल्या लोकांना भारताने आश्रय दिला. विवेकानंदांना विनेकानंद बनवण्यात छत्तीसगडच्या मातीचेही मोठे योगदान आहे. यासोबतच द्वेष पसरवणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी, यावेळी बोलताना दिला.

'धर्मावर भांडण्यापेक्षा मदत हवी'

मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, कालीचरण सारखी माणसे समाजासाठी कुष्ठरोगी आहेत. कोरोना महामारीच्या काळात आर्थिक मदत देण्याची गरज आहे, धर्मावर लढण्याची नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT