MS Dhoni Dainik Gomantak
देश

MS Dhoni CSK Captain: कॅप्टन कूलकडे पुन्हा CSK ची धुरा, ऋतुराज गायकवाड संपूर्ण हंगामातून बाहेर!

महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनला आहे. आयपीएल 2025 च्या मध्यात धोनीला अचानक पुन्हा एकदा चेन्नईचे नेतृत्व करण्याची वेळ आली.

Manish Jadhav

महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनला. आयपीएल 2025 च्या मध्यात धोनीला अचानक पुन्हा एकदा चेन्नईचे नेतृत्व करण्याची वेळ आली. चेन्नईला पाच आयपीएल जेतेपद मिळवून देणारा धोनी सुमारे दीड हंगामानंतर संघाचा कर्णधार म्हणून परतत आहे. दुसरीकडे, नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीने ग्रस्त असल्याने तो आता संपूर्ण हंगामातून बाहेर पडला, ज्यामुळे धोनीकडे चेन्नईची धुरा आली. या मोठ्या घडामोडीमुळे आता स्पर्धेच्या मध्यात धोनीच्या निवृत्तीबद्दलच्या अटकळांना आणि अफवांनाही पूर्णविराम मिळाला आहे.

ऋतुराज दुखापतग्रस्त, धोनीकडे CSKची धुरा

आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. मात्र आता, धोनीकडे चेन्नईचे नेतृत्व आल्याने पुन्हा संघाला उर्जा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, चेन्नईचा सहावा सामना शुक्रवारी (11 एप्रिल) खेळला जाणार असून त्याच्या एक दिवस आधी संघात हा मोठा बदल झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कर्णधारपदासाठीचा हा बदल ऋतुराजच्या दुखापतीमुळे झाला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात ऋतुराजला दुखापत झाली होती. यानंतरही तो पुढील 2 सामने खेळला होता, पण आता दुखापत गंभीर असल्याने त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

कर्णधारपदाबाबत अटकळ

याआधीही धोनीच्या कर्णधारपदाबद्दल अटकळ होती. 5 एप्रिल रोजी चेन्नईमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यापूर्वीच ऋतुराजच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. तो त्या सामन्यातून बाहेर पडेल असेही संगितले जात होते. अशा परिस्थितीत धोनीचे कर्णधार म्हणून पुनरागमन निश्चित मानले जात होते. पण ऋतुराज तो सामना खेळला आणि त्यानंतर तो पंजाब किंग्जविरुद्धही मैदानात उतरला. पण या दोन्ही सामन्यांमध्ये तो फक्त 6 धावा करु शकला, यावरुन स्पष्ट होते की, तो कदाचित पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

Farmagudhi to Bhoma Road: फर्मागुढी-भोम रस्ता काम होणार सुरु! मंत्री कामतांची ग्वाही; बांदोडा ‘अंडरपास’चे उद्‌घाटन

Chimbel Unity Mall: 'चिंबल' ग्रामस्थांचे मोठे यश! युनिटी मॉल बांधकाम परवान्याला दिले आव्हान; सरकारी पक्षाचा विरोध फेटाळला

SCROLL FOR NEXT