Girlfriend Dainik Gomantak
देश

Madhya Pradesh: प्रेयसीला मारहाण करणाऱ्या तरुणावर मामा सरकारची कारवाई, मुख्यमंत्री योगींच्या धर्तीवर...

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात तरुणीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी कारवाई करताना प्रशासनाने स्टेशन प्रभारीला निलंबित केले आहे.

दैनिक गोमन्तक

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात तरुणीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी कारवाई करताना प्रशासनाने स्टेशन प्रभारीला निलंबित केले आहे. तसेच या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीचे घर बुलडोझरने पाडण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकराने प्रेयसीला लग्नासंबंधी विचारले, तेव्हा तिने नकार दिला. प्रेयसीने विरोध केल्यावर प्रियकराने तिला बेदम मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, रीवा जिल्ह्यातील मौगंज पोलिस स्टेशन हद्दीतील ढेरा गावाजवळ एका मुलीसोबत झालेल्या भांडणप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना (Accused) अटक केली आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. त्याचवेळी महिलांशी संबंधित गुन्ह्यात निष्काळजीपणा करणाऱ्या मौगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी सोता मौर्य यांना निलंबित करण्यात आले आहे.

यासोबतच, या संपूर्ण प्रकरणाचा तपास मौगंजचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक लाल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दुसरीकडे, मुख्य आरोपी पंकज त्रिपाठी याच्या बेकायदा बांधकामावर जिल्हा प्रशासनाने बुलडोझर चालवत त्याचे घर जमीनदोस्त केले आहे.

तर, ढेरा गावाजवळ एका तरुणाने आपल्या प्रेयेसीला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्याच सहकाऱ्याने मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. असे सांगितले जात आहे की, आरोपी तरुण त्याच्या प्रेयसीला त्याच्याशी लग्न करण्यास भाग पाडत होता. याला प्रेयसीने विरोध करुन आपले कुटुंबीय या लग्नाला तयार होणार नसल्याचे सांगताच तरुणाने तरुणीला बेदम मारहाण केली. तरुण बेशुद्ध होईपर्यंत तिला मारहाण करत होता. यानंतर घटनेचा व्हिडिओ त्याच्याच मित्राने सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी साथीदाराला अटक केली आणि मुख्य आरोपीचा शोध सुरु केला.

दुसरीकडे, सायबर सेलच्या मदतीने मुख्य आरोपी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने छापा टाकून त्याला काल रात्री एक वाजता अटक केली. पोलीस आता त्याची चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT