Madhya Pradesh Assembly Election: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. काँग्रेसची नजर आता मध्य प्रदेशवर खिळली आहे, जिथे वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीही (Madhya Pradesh Assembly Election) काँग्रेसने मोफत विजेसह जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचे आश्वासन दिले आहे.
कर्नाटकात लागू झालेल्या 'गॅरंटीचा' संदर्भ देत काँग्रेसने सोमवारी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, 'त्यांनी कर्नाटकात दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत, आता मध्य प्रदेशची पाळी आहे. मध्य प्रदेशात विजयी झाल्यानंतर आम्ही तेच करु.'
काँग्रेसने ट्विट करुन म्हटले की, 'मध्य प्रदेशातील जनतेला काँग्रेसचे वचन. गॅस सिलिंडर: 500 रुपये, प्रत्येक महिलेला दरमहा 1,500 रुपये, वीज: 100 युनिट माफ, 200 युनिट हाफ, शेतकऱ्यांची कर्जमाफी, जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल.'
विशेष म्हणजे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी सांगितले की, 'आश्वासनाप्रमाणे, काँग्रेस सरकारने निवडणुकीपूर्वी पक्षाच्या जाहीरनाम्यात दिलेल्या पाच गॅरंटींना तत्वतः मान्यता दिली आहे.' सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
प्राथमिक अंदाजानुसार, गॅरंटीची पूर्तता करण्यासाठी दरवर्षी ₹ 50 हजार कोटींची आवश्यकता असेल. नवनियुक्त मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, 'पक्षाने मागील कार्यकाळात दिलेल्या 165 पैकी 158 आश्वासने पूर्ण केली आहेत. आम्ही दिलेली आश्वासने पाळली आहेत.
आश्वासने पूर्ण करण्यासोबतच आम्ही इंदिरा कॅन्टीन, कर्जमाफी, विद्या सिरी इत्यादी 30 हून अधिक नवीन योजना सुरु केल्या आहेत. जाहीरनाम्यात या योजनांचा समावेश नव्हता.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.