MP High Court verdict Dainik Gomantak
देश

Madhya Pradesh Murder Case: 'मी 1000 नवरे ठेवू शकते', वादग्रस्त विधानानंतर पत्नीची हत्या; दोषी पतीला हायकोर्टाकडून दिलासा, जन्मठेपेची शिक्षा 7 वर्षांवर

MP High Court verdict: मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एका अत्यंत संवेदनशील प्रकरणाची सुनावणी करताना, आपल्या सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीची हत्या करणाऱ्या पतीची जन्मठेपेची शिक्षा कमी करुन ती सात वर्षांच्या सश्रम कारावासात बदलली.

Manish Jadhav

Madhya Pradesh Murder Case: मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एका अत्यंत संवेदनशील प्रकरणाची सुनावणी करताना, आपल्या सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीची हत्या करणाऱ्या पतीची जन्मठेपेची शिक्षा कमी करुन ती सात वर्षांच्या सश्रम कारावासात बदलली. न्यायमूर्ती विवेक अग्रवाल आणि न्यायमूर्ती अवनेंद्र कुमार सिंह यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने म्हटले की, तीव्र वादादरम्यान पत्नीने 'ती आपल्या पतीसारखे एक हजार पती ठेवू शकते' असे म्हणणे म्हणजे पुरुषाच्या आत्मसन्मानावर आणि प्रतिष्ठेवर थेट हल्ला होता. न्यायालयाने कायद्याच्या चौकटीत या विधानाला 'अचानक आणि गंभीर प्रक्षोभ' मानले.

हे प्रकरण जुलै 2021 मधील आहे, जेव्हा छिंदवाडा जिल्ह्यातील चौरई ब्लॉकचा रहिवासी असलेला आरोपी शिवा कहार आपली पत्नी किरणसोबत कुल बहेरी नदीच्या खर्रा घाटावर गेला होता. तिथे दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरुन कडाक्याचे भांडण सुरु झाले. वाद इतका वाढला की, किरणने रागाच्या भरात पतीला उद्देशून ते वादग्रस्त विधान केले. या विधानाने संतप्त झालेल्या शिवाने रागाच्या भरात जवळच पडलेला एक मोठा दगड उचलून पत्नीच्या डोक्यात मारला, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. किरण त्यावेळी सात महिन्यांची गर्भवती होती.

या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने आरोपी शिवाला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, ज्याच्या विरोधात त्याने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पुराव्यांची तपासणी केल्यानंतर स्पष्ट केले की, हा पूर्वनियोजित खून नव्हता. यामागे न्यायालयाने प्रामुख्याने दोन मोठी कारणे दिली. पहिले म्हणजे, घटनेनंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्याने स्वतः फोन करुन सासऱ्यांना आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. तसेच, त्याने पुरावे नष्ट करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.

न्यायालयाने टिप्पणी केली की, जेव्हा एखादी पत्नी आपल्या पतीला असे बोलते, तेव्हा ते पतीला पूर्णपणे मूल्यहीन ठरवण्यासारखे आहे. एक माणूस म्हणून हे त्याच्या अस्तित्वावर केलेला आघात आहे, ज्यामुळे कोणतीही व्यक्ती स्वतःवरील नियंत्रण गमावू शकते. वैद्यकीय आणि फॉरेन्सिक अहवालांच्या आधारे, न्यायालयाने हा गुन्हा जाणूनबुजून केलेली हत्या (कलम 302) नसून, पूर्वहेतू नसलेला पण मृत्यू होऊ शकतो या जाणिवेने केलेले कृत्य (IPC कलम 304 भाग-2) असल्याचे मान्य केले. यानंतर न्यायालयाने शिवाची जन्मठेपेची शिक्षा कमी करुन त्याला 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa politic: 'ते' प्रवर्तक राजकारणात नवखेच! गोवा काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष फ्रान्सिस गोविया वेळसावचे

FIFA World Cup 2026: फुटबॉल विश्वात खळबळ! इंग्लंडच्या खेळाडूंची 'विचित्र' तयारी; मेक्सिकोला नमवण्यासाठी खेळाडू घेणार 'व्हायग्रा'ची मदत

दारूच्या नशेत विहिरीची 'सफर'; 'स्टंट' पडला महागात; थेट विहिरीत कोसळला पर्यटक! अग्निशमन दलाने वाचवला जीव!

Goa Crime: सुर्लकर खून प्रकरण: एका बाजूला आक्रोश, दुसऱ्या बाजूला आशेची धडपड! कोर्टात भावनांचा कल्‍लोळ

Ram Mandir Donation Theft: राम मंदिर देणगी चोरीप्रकरणी भाजप कोणाला वाचवित आहे? केजरीवाल यांचा प्रश्न; निष्पक्ष चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT