Narottam Das Dubey Dainik Gomantak
देश

Madhya Pradesh: रामकथेचं आयोजन करणं पडलं महागात, कथावाचकाच्या पट्टशिष्याने पळवली बायको

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामकथेचं आयोजन करणं एका जोडप्याला चांगलंचं महागात पडलं.

Manish Jadhav

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामकथेचं आयोजन करणं एका जोडप्याला चांगलंचं महागात पडलं. कथावाचकाचा पट्टशिष्य यजमान व्यक्तीची बायको घेऊन फरार झाला.

याप्रकरणी पीडित पतीने कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी हरवल्याची नोंद केली. पोलिस सूत्रांनी सांगितले की, तक्रारदाराची पत्नी सापडल्यानंतर महिनाभरानंतर पोलिसांनी तिला पोलिस ठाण्यात बोलावून तिचे म्हणणे नोंदवले.

यादरम्यान महिलेने (Woman) पतीसोबत जाण्यास नकार दिला. चित्रकूट धामचे धीरेंद्र आचार्य यांचे शिष्य नरोत्तम दास दुबे यांच्यासोबत राहण्याविषयी तिने सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये महिलेचा पती राहुल तिवारी याने गौरीशंकर मंदिरात रामकथेचे आयोजन केले होते, तेव्हा दोघांमध्ये जवळीकता वाढली होती.

चित्रकूटचे कथाकार धीरेंद्र आचार्य यांना कथा वाचनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. आचार्य धीरेंद्र यांच्यासोबत त्यांचे शिष्य नरोत्तम दास दुबे हेही रामकथेला पोहोचले.

पीडित व्यक्तीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कथेदरम्यान नरोत्तम दास दुबे याने पत्नीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले.

यानंतर, दोघांमध्ये एकमेकांच्या मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली. दोघे एकमेकांशी बोलू लागले. दरम्यान, 5 एप्रिल रोजी नरोत्तम दास पत्नीसह फरार झाला.

छतरपूरचे एसपी अमित सांघी यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, वादामुळे महिलेला पतीसोबत राहायचे नव्हते. अशा वेळी एकही केस निघत नाही. तरीही पोलीस (Police) या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

SCROLL FOR NEXT