MP Arjun Singh Dainik Gomantak
देश

बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का, खासदार अर्जुन सिंह टीएमसीमध्ये दाखल

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. बराकपूरचे खासदार अर्जुन सिंह (MP Arjun Singh) यांनी रविवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांना कोलकाता येथे पक्षात प्रवेश मिळवून दिला.

दरम्यान, बंगालमधील बराकपूरचे भाजप खासदार अर्जुन सिंग यांच्या अलीकडील ट्विटमुळे ते पक्षात असमाधानी असल्याच्या कयासांना चालना मिळाली होती. अर्जुन सिंह यांनी अलीकडेच पश्चिम बंगालमधील (West Bengal) भाजप नेतृत्वावर पक्षात वरिष्ठ पदावर राहूनही ते योग्य पद्धतीने काम करु देत नसल्याची टीका केली होती.

तसेच, अर्जुन सिंह 2001 मध्ये टीएमसीचे आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले होते. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. पक्षाने बराकपूरमधून तिकीट दिले आणि ते खासदार झाले. तब्बल तीन वर्षांनंतर ते पुन्हा एकदा जुन्या पक्षात गेले आहेत. अर्जुन सिंह यांची राजकीय कारकीर्द काँग्रेस (Congress) पक्षापासून सुरु झाली. नंतर टीएमसीमध्ये सामील झाले आणि आमदारही झाले.

अभिषेक बॅनर्जी यांनी ट्विट करत म्हटले की, "भाजपला नाकारत TMC मध्ये सामील झालेल्या अर्जुन सिंहांचे हार्दिक स्वागत आहे. देशभरातील लोक त्रस्त आहेत. त्यांना आता आमची गरज आहे. चला लढा चालू ठेवूया.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT