Child
Child Dainik Gomantak
देश

धक्कादायक! 15 दिवसांच्या नवजात बालकाला विकून आईने घेतला फ्रिज

दैनिक गोमन्तक

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये आईच्या प्रेमाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. इथे एका आईने आपले 15 दिवसांचे नवजात बालकाला विकले आहे. मुलाला विकून मिळालेल्या पैशातून आईने फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशिन अशा वस्तू खरेदी केल्या आहेत. आरोपी आईने पतीच्या संमतीने हा व्यवहार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी सहा आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे. (Mother sells 15-day new born baby and buys fridge TV cooler Police arrested 6 people in Madhya Pradesh)

मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरच्या (Indore) हीरा नगर भागात राहणाऱ्या शायरा बी या महिलेने पोलिसांना सांगितले की, 'माझ्या पतीला गर्भपात करायचा होता, पण वेळ खूप जास्त होता, त्यामुळे आम्ही दलालांमार्फत मूल विकण्याचा बेत आखला आणि ते मूल देवास येथील एका जोडप्याला विकले.' हे मूल लीना नावाच्या महिलेने विकत घेतल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले. लीनाने सांगितले की, अलीकडेच माझ्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मी मुलाला साडेपाच लाखांना विकत घेतले.

8 पैकी 6 आरोपींना अटक

पोलिसांनी सांगितले की, मुलाची विक्री केल्यानंतर मिळालेल्या पैशातून महिलेने टीव्ही, फ्रीज, कुलर आणि वॉशिंग मशीन या वस्तू खरेदी केल्या होत्या, त्या आता जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी पुढे सांगितले की, 'सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या प्रकरणाची माहिती देण्यात आली. याप्रकरणी आरोपी आई शायरा बी हिच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एक अल्पवयीनही आहे. यातील सहा आरोपींना अटक करण्यात आली असून दोन सध्या फरार आहेत. लवकरच फरार आरोपींनाही जेरबंद करण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

Goa Today's Live News: इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

India Canada Relations: जस्टिन ट्रुडोचे पुन्हा बरळले, आम्ही खलिस्तानसोबत आहोत; भारतासोबतच्या संबंधांवर काय म्हणाले?

Loksabha Election : प्रचारासाठी पायाला भिंगरी, जनसामान्‍यांना भेटीची आस; पल्‍लवी धेंपे यांचा प्रचार

Margao News : मतदानाला प्रेरित करण्‍यास पॅरा ग्‍लायडर्सचा वापर : आश्‍वीन चंद्रू

SCROLL FOR NEXT