Moscow Format: Indian Will help Afghanistan Dainik Goamanatk
देश

भारत करणार तालिबानला मदत, मॉस्को बैठकीत झाला मोठा निर्णय

Moscow Format या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अमेरिका, चीन, भारत, इराण आणि पाकिस्तानसह 10 देशांना आमंत्रणे पाठवण्यात आली होती.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तान (Afghanistan) प्रश्नासाठी रशियाकडून (Russia) मॉस्को फॉरमॅट (Moscow Format) या बैठकीचं आयोजन केलं गेलं आहे. वर्ष 2017 पासून, या बैठकीसाठी अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर मॉस्को स्वरूप तयार केले गेले. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अमेरिका (USA), चीन (China), भारत, इराण (Iran) आणि पाकिस्तानसह (Pakistan) 10 देशांना आमंत्रणे पाठवण्यात आली होती.तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानात सत्ता मिळवल्यानंतर रशिया पहिल्यांदाच या बैठकीचे आयोजन करत आहे आणि तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर भारतीय शिष्टमंडळ आणि तालिबान अधिकारी समोरासमोर येण्याची देखील ही पहिलीच वेळ आहे.(Moscow Format: Indian Will help Afghanistan)

या बैठकीदरम्यान भारतीय शिष्टमंडळाने अफगाणिस्तानसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे ज्यात भारत आता अफगाणिस्तानला मोठी मदत करणार आहे तालिबानचे अधिकृत प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे की भारत अफगाणिस्तानला मदत करण्यास तयार आहे.त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, मॉस्कोमध्ये झालेल्या बैठकीत भारतीय अधिकाऱ्याने म्हटले आहे की, अफगाणिस्तानच्या लोकांना मानवी मदतीची गरज आहे, अफगाणिस्तान सध्या एका कठीण परिस्थितीतून जात आहे. भारत अफगाणिस्तानला मानवतावादी मदत देण्यास तयार आहे. मात्र भारताकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.हे देखील त्यांनी सपष्ट केले आहे.

अफगाणिस्तानच्या न्यूज वेबसाईट टोलो न्यूजच्या मते, तालिबानला या बैठकीतून मोठ्या आशा आहेत. तालिबानने अफघाणवर कब्जा मिळवल्यानंतर अनेक देशांनी अफगाणिस्तानचा निधी गोठवल्यापासून, हा देश आर्थिक संकट आणि उपासमारीच्या धोक्याचा सामना करत आहे. तालिबानने सर्वसमावेशक सरकारचे आश्वासन पाळले नसल्याने रशियाला तालिबानला आंतरराष्ट्रीय मान्यता देण्याची घाई नाही.या बैठकीसाठी अमेरिकेला देखील आमंत्रित करण्यात आले होते, परंतु अमेरिकेने या बैठकीपूर्वी दोहा येथे तालिबानच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली आहे आणि आता या बैठकीला उपस्थित नाही.

रशियाशिवाय ताजिकिस्तान आणि उझबेकिस्ताननेही तालिबान सरकारबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तालिबान सरकारने जाहीरपणे दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचे या देशांनी सांगितले आहे. नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याच कतारने तालिबानला असेही सांगितले आहे की जर त्यांना इस्लामिक सरकार चालवायचे असेल तर त्यांनी कतारकडून शिकले पाहिजे. तर दुसरीकडे पाकिस्तान तालिबान सरकारला पूर्ण पाठिंबा देत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंत

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Goa News: डिपॉझिट रिफंड योजनेवरुन 'गोवा कॅन'चा धोक्याचा इशारा! विक्रेते व ग्राहकांमध्ये तंटा होण्याची वर्तवली शक्यता

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT