हवामान खाते  Danik Gomantak
देश

Monsoon update: राज्यात पुन्हा एकदा पावसाचा तडाखा, कोठे होणार पाऊस?

अरबी समुद्रात (Arabian Sea)कमी दाबाची तिव्रता वाढून ‘शाहीन’ ('Shaheen')चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे चक्रीवादळ (Hurricane)मकरान किनाऱ्याकडे जाऊन त्याची दिशा बदलून ओमानकडे जाण्याचे चिन्हे आहेत.

दैनिक गोमन्तक

राज्यात पावसासाठी पोषक हवामान सुरु होत असल्याने शनिवारपासून विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची (Rain)शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावस पडण्याची शक्यता आहे असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

बिहार आणि परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. पूर्वेकडून वारे वाहत आहेत त्यामुळे वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागराकडून तामिळनाडू च्या किनाऱ्यापर्यंत कमी दाबाचा हवेचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.

कोकणातील ठाणे आणि रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः कोरडे हवामान होते.

‘शाहीन’ चक्रीवादळ जाणार ओमानकडे:

अरबी समुद्रात कमी दाबाची तिव्रता वाढून ‘शाहीन’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे चक्रीवादळ मकरान किनाऱ्याकडे (shore)जाऊन त्याची दिशा बदलून ओमानकडे जाण्याचे चिन्हे आहेत. भारताच्या किनाऱ्यापासून दूर गेलेल्या या प्रणालीमुळे महाराष्ट्राला (Maharashtra)कोणताही धोका नाही.

बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यातून आंध्रप्रदेश, तेलंगाणा, महाराष्ट्राच्या मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातून गुजरातमधून (Gujarat)अरबी समुद्रात गेल्यानंतर त्याचे पुन्हा चक्रीवादळात रुपांतरण झाले आहे. शुक्रवारी दुपारी ही वादळी प्रणाली देवभूमी द्वारिकेच्या पश्चिमेकडे 440 किलोमीटर, इराणच्या चाबहार बंदरापासून पूर्वेकडे तर 490 किलोमीटर तर ओमानच्या मस्कतपासून 660 किलोमीटर अग्नेयेकडे अरबी समुद्रात आहेत.

मॉन्सून लवकरच परतीवर:

अरबी समुद्रातील शाहीन चक्रीवादळ कमी झाल्यानंतर मंगळवार नंतर देशाच्या वायव्य भागात वाऱ्याची दिशा बदलण्याची शक्यता आहे. आर्द्रतेती टक्केवारी कमी होण्याचे संकेत आहे. या भागात मुख्यतः कोरडे हवामान होणार असल्याने बुधवारपासून मॉन्सून परतीच्या प्रवासाला पोषक हवामान तयार होईल असे हवामान विभागाकडून (Meteorological Department)सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT