भारतीय हवामान विभागाने (IMD) कोकण आणि गोवा, गुजरातच्या काही भागात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज वर्तवला आहे आणि रेड अलर्टही (Red Alert) जारी केला आहे. याशिवाय, सौराष्ट्र आणि कच्छसह मराठवाड्यातही मंगळवारी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. याशिवाय केवळ गुजरातमध्ये बुधवारसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच आता गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव भारतातून कमी होताना दिसत आहे. (Monsoon Update: Heavy Rain in all over in country, Gulab cyclone began to fade)
दरम्यान काल गुलाब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशमध्ये धडक दिली , ज्यामुळे कृष्णा आणि श्रीकाकुलम जिल्ह्यात तासंतास मुसळधार पाऊस झाला आणि बऱ्याच ठिकाणी पाणी साचले आहे , ज्यामुळे सामान्य जनजीवन ठप्प झाले आहे .
तर दुसरीकडे मध्य प्रदेशातही गुलाब वादळाचा प्रभाव कायम आहे आणि 30 सप्टेंबरपर्यंत हवामान स्थिर राहील असा अंदाज वर्तवला जात आहे . परिस्थिती पाहता या भागात हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे आणि इंदौर, धार, खंडवा, खरगोन, अलिराजपूर, बुरहानपूर आणि बैतूल जिल्ह्यांत 24 तासांच्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.हवामान खात्याने पूर्वानुमानात जबलपूर, उज्जैन, होशंगाबाद आणि शहडोल विभागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वीज पडण्याची शक्यता दिली आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, उत्तर पश्चिम मध्य प्रदेश वर एक वरचे चक्रीवादळ तयार होत आहे. याशिवाय, मान्सून ट्रफ लाईन बिकानेर, कोटा, सागर, पेंद्रा रोड आणि इतर ठिकाणी बंगालच्या उपसागरापर्यंत एक ट्रफ तयार होत आहे.त्याचबरोबर मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तर दुसरकिडे देशातील अनेक राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवीली जात आहे
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.