Monsoon Update: Heavy rains in Mumbai and all over the country  Dainik Gomantak
देश

Monsoon Update:मुंबईत जोरदार पाऊस तर देशभरात वरुण राजा लावणार हजेरी

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील (Maharashtra) विदर्भ आणि मुंबई (Mumbai) भागात आजपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे (Monsoon Update). बंगालच्या उपसागरावर (Bay of Bengal) एक चक्रीवादळ परिसंचरण विकसित होत आहे. तो जसजसा तीव्र होईल तसतसा महाराष्ट्रात आणखी पाऊस वाढण्याची शक्यता आहे (Heavy Rain) . याची सुरवात सर्वप्रथम विदर्भात पाऊसापासून होईल. जरी ते मुख्यतः राज्याच्या उत्तर भागाला पूर्व ते पश्चिम कव्हर करेल, परंतु काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. यानंतर, पालघर, ठाणे आणि मुंबईच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस पडेल.(Monsoon Update: Heavy rains in Mumbai and all over the country)

ओडिशा, छत्तीसगढचा काही भाग, गंगाच्या पश्चिम बंगाल, झारखंड, दक्षिण राजस्थानचा काही भाग आणि विदर्भ आणि तेलंगणा या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर दुसरीकडे उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, ईशान्य भारत, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात, कोकण आणि गोवा, अंदमान आणि निकोबार बेटे आणि उत्तर किनारपट्टी आंध्र प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस बारसण्याची शक्यता आहे.मध्य महाराष्ट्र, रायलसीमा, किनारपट्टी कर्नाटक आणि केरळमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

रविवारी दिल्लीमध्ये कमाल तापमान 34.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे . भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली असून विभागाकडून असे सांगण्यात आले की किमान तापमान 26 अंश सेल्सिअस होते, जे सामान्यपेक्षा एक अंश सेल्सियस अधिक होते. त्याचवेळी संध्याकाळी 5.30 वाजता आर्द्रता 67 टक्के नोंदवली गेली आहे.

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, सोमवारी आकाश ढगाळ राहील आणि कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. शनिवारी दिल्लीचे कमाल तापमान 34.4 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24.6 अंश सेल्सिअस होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

Anti Aircraft Missile System: कोणत्या देशांकडे आहे बेस्ट एण्टी एअरक्राफ्ट मिसाईल सिस्टीम; भारताचं काय स्टेटस?

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Mhadei Water Dispute: 'म्हादई'बाबत चुकीची माहिती नको! नेरसे येथे जलवाहिनीचे काम सुरु नाही

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

SCROLL FOR NEXT