Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: दगड उगारला अन् माकड चवताळलं! आजीला 'ती' चूक पडली महागात, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी घेतली मजा

Monkey Attack Viral Video: आजच्या धावपळीच्या युगात सोशल मीडिया हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला.

Manish Jadhav

Monkey Attack Viral Video: आजच्या धावपळीच्या युगात सोशल मीडिया हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला. ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत, त्याचप्रमाणे दिवसातून एकदा तरी सोशल मीडियाच्या विश्वात डोकावून पाहणे ही अनेकांसाठी सवय झाली आहे. याच सोशल मीडियाच्या जगात दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होतात, यातील काही व्हिडिओ मनोरंजन करतात, तर काही आपल्याला विचार करायला भाग पाडतात. सध्या असाच एक थरारक व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये एका वृद्ध महिलेची एका माकडासोबत झालेली झटापट पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

या व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, एक लहान माकड (Monkey) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका स्कूटीजवळ शांतपणे बसले आहे. इतक्यात एक आजी त्या माकडाला तिथून हाकलण्यासाठी तिथे पोहोचते. आजीच्या हातात एक मोठा दगड असून ती माकडाला घाबरवण्यासाठी त्याच्या दिशेने धावत जाते. हातात दगड पाहून माकड सुरुवातीला घाबरते आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी स्कूटीच्या पुढच्या बाजूला चढते. मात्र, जेव्हा आजी खरोखरच दगड मारण्याचा प्रयत्न करते, तेव्हा माकड बाजूला उडी मारते.

आजीने दगड भिरकावताच माकड चवताळते आणि तिथून पळून जाण्याऐवजी उलट आजीवरच हल्ला चढवते. माकड इतक्या वेगाने तिच्या अंगावर धावून जाते की आजीची भंबेरी उडते. सुदैवाने, त्याचवेळी एक दुसरा व्यक्ती तिथे धावून आल्यामुळे माकड तिथून पळून जाते, अन्यथा मोठी दुखापत होण्याची शक्यता होती.

हा थरारक व्हिडिओ 'X' यावर @BhanuNand नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला. या व्हिडिओला "बंदर से पंगा लेना दादी जी को भारी पड़ गया" असे कॅप्शन देण्यात आले. हा व्हिडिओ पोस्ट केल्यापासून हजारो लोकांनी तो पाहिला असून त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. एका युजरने गमतीने लिहिले की, "हे तर उलट आजीलाच पळवून लावल्यासारखे झाले," तर दुसऱ्याने सावधगिरीचा इशारा देत म्हटले की, "आजीने माकडाच्या इतक्या जवळ जायला नको होते."

काही युजर्संनी आजींच्या धाडसाचे कौतुक केले, तर काहींनी "आजीने स्वतःच्या वयाचा विचार करायला हवा होता, माकडं खूप खोडकर आणि धोकादायक असतात," असा सल्लाही दिला. हा व्हिडिओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असून प्राण्यांशी पंगा घेणे कसे महागात पडू शकते, याचे जिवंत उदाहरण मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT