Viral Video: मेट्रो स्टेशन की कुस्तीचा आखाडा? दोन महिलांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी; एकमेकींना पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं

Viral video metro station fight: दिल्ली मेट्रो हे केवळ प्रवासाचे साधन राहिले नसून ते आता वादाचे आणि विचित्र घटनांचे केंद्र बनले आहे की काय, असा प्रश्न पडू लागला आहे.
Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: दिल्ली मेट्रो हे केवळ प्रवासाचे साधन राहिले नसून ते आता वादाचे आणि विचित्र घटनांचे केंद्र बनले आहे की काय, असा प्रश्न पडू लागला आहे. मेट्रोच्या डब्यात होणारे डान्स आणि वादाचे व्हिडिओ जुने होत असतानाच, आता मेट्रो स्टेशनच्या बाहेरील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियाव धुमाकूळ घालत आहे. यामध्ये दोन महिला भररस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी एकमेकींच्या अंगावर धावून जाताना आणि एकमेकींना बेदम मारहाण करताना दिसत आहेत.

केसांची ओढाताण अन् लात-बुक्क्यांचा पाऊस

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दृश्य अत्यंत विचलित करणारे आहे. मेट्रो स्टेशनच्या सरकत्या पायऱ्यांजवळ अचानक वातावरण तापते. एक महिला वेगाने धावत येते आणि दुसऱ्या महिलेचे केस पकडून तिला जमिनीवर पाडते.

इतक्यावरच न थांबता ती महिला जमिनीवर पडलेल्या दुसऱ्या महिलेवर लाथा-बुक्क्यांनी प्रहार करू लागते. या अनपेक्षित हल्ल्याने दुसरी महिला सुरुवातीला गोंधळते, पण नंतर तीदेखील सावरून जोरदार प्रत्युत्तर देते. दोन्ही महिलांमधील राग इतका अनावर होता की कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत त्या नव्हत्या.

Viral Video
VIDEO: हवेत झेप अन् एकहाती कॅच! फिल सॉल्ट बनला 'स्पायडरमॅन', इशान किशनचा घेतला अप्रतिम झेल; फील्डिंगचा सर्वात मोठा थरार

बघ्यांची गर्दी अन् 'घर के कलेश'चा तडका

या संपूर्ण राड्यादरम्यान आसपास अनेक लोक उपस्थित होते. मात्र, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भांडण सोडवण्याऐवजी अनेकजण हा तमाशा पाहण्यात आणि आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यात मग्न होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर @gharkekalesh या प्रसिद्ध हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या काही तासांत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यावर संमिश्र प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

Viral Video
Viral Post: 'Imagine after two ducks... विराट कोहली संपला...,' RCBच्या विजयानंतर मोहम्मद कैफची 'ती' पोस्ट तुफान व्हायरल

या हाणामारीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतु सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे वागणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही नेटकऱ्यांनी या घटनेचा उपरोधकपणे आनंद घेतला असला, तरी सुज्ञ नागरिकांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. मेट्रो परिसरात सुरक्षा रक्षक असतानाही असा प्रकार घडणे आणि लोकांनी संयम सोडून रस्त्यावर उतरणे हे सामाजिक आरोग्यासाठी घातक असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com