Gujarat Viral video Dainik Gomantak
देश

Viral video : काका असावा तर असा; पुतण्याच्या लग्नात पाडला नोटांचा पाऊस, पहा व्हायरल व्हिडिओ

गुजरातधील मेहसाणा जिल्ह्यातील अंगोल गावातील घटना

Rajat Sawant

Viral video : गुजरातधील एका गावात माजी सरपंचाने पुतण्याच्या लग्नाच्या वरातीत चक्क 100, 500 रुपयांच्या अनेक नोटांची बरसात केल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या नोटा गोळा करण्यासाठी रस्त्यावर झुंबड उडाली होती.

गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील अंगोल या गावचे माजी सरपंच घराच्या खाली जमलेल्या जमावावर 100 ते 500 रुपयांच्या नोटांचा वर्षाव करताना दिसून आले. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अंगोलचे सरपंच करीम यादव यांचा पुतण्या रझाक यांच्या लग्नाचा एक भाग म्हणून वरातीत पैसे फेकले गेले.

माजी सरपंच करीम यादव यांच्या पुतण्याच्या लग्नाची वरात सुरु होती. माजी सरपंच आणि त्यांचे कुटुंबीय गच्चीवर गेले आणि वरातीमधील जमावावर पैशे फेकले. या नोटा गोळा करण्यासाठी रस्त्यावर झुंबड उडाली होती.

अधिकाधिक नोटा मिळवण्याच्या नादात लोकांनी एकमेकांना धक्काबुक्कीही केली. यावेळी बॅकग्राऊंडमध्ये जोधा अकबरमधील ‘अझीम-ओ-शान शहेनशाह’ हे बॉलिवूडमधील गाणे वाजत आहे.

जेसीबीमध्ये बसविण्यात आलेल्या रज्जाकची वरात लग्नमंडपात आली तेव्हा सर्वांनी त्यांचे जंगी स्वागत केले. सोशल मीडियावर या व्हिडिओने अनेकांना चकित केले असताना, नोटा आणि दागिन्यांचा वर्षाव ही गुजरातमध्ये नित्याचीच घटना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT