Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

Money Laundering Case: राहुल गांधींना ईडीने उद्या पुन्हा बोलावले

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची पुन्हा चौकशी केली. मात्र, आता त्यांना मंगळवारी पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Money Laundering Case: कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची पुन्हा चौकशी केली. मात्र, आता त्यांना मंगळवारी पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहे.

दरम्यान, राहुल गांधी (Rahul Gandhi) मध्य दिल्लीतील एपीजे अब्दुल कलाम रोडवर असलेल्या ईडी मुख्यालयात सकाळी 11.05 च्या सुमारास सीआरपीएफ जवानांच्या "झेड+" श्रेणीच्या सुरक्षेसह पोहोचले होते. एक दिवस आधी राहुल गांधींचा 52 वा वाढदिवस होता. दुसरीकडे, सोनिया गांधी यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तसेच, केंद्रीय तपास संस्थेच्या कार्यालयाभोवती पोलिस आणि निमलष्करी दलाचे कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर या परिसरात कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. दुपारी साडेतीन वाजता राहुल गांधी ईडी कार्यालयातून जेवणासाठी बाहेर आले आणि सुमारे तासाभरानंतर पुन्हा ईडी (ED) कार्यालयात पोहोचले.

दुसरीकडे, 52 वर्षीय राहुल गांधी यांची ईडी अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सलग तीन दिवस 30 तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. ज्यादरम्यान मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) त्यांचे जबाब नोंदवण्यात आले होते.

कोणते प्रश्न विचारले गेले?

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याच प्रकरणी ईडीने 23 जून रोजी सोनिया गांधी यांना समन्स बजावले आहे. राहुल गांधींना 'यंग इंडियन'ची स्थापना, 'नॅशनल हेराल्ड' चालवणे आणि काँग्रेसने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) ला दिलेली कर्जे आणि मीडिया संस्थेमध्ये निधी हस्तांतरित करण्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT