mohammed siraj Dainik Gomantak
देश

IND vs ENG: मोहम्मद सिराजची कमाल! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा ठरला 25वा भारतीय

Mohammed Siraj Record: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने आपल्या कारकिर्दीत एक मोठी कामगिरी केली.

Manish Jadhav

Mohammed Siraj Record: भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल (Oval) मैदानावर सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने आपल्या कारकिर्दीत एक मोठी कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) 200 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा तो 25वा भारतीय खेळाडू ठरला.

ऑली पोपला बाद करुन पूर्ण केले 'द्विशतक'

दरम्यान, दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा (Team India) पहिला डाव 224 धावांवर संपुष्टात आल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी जोरदार सुरुवात केली. त्यांची सलामीची जोडी 12 षटकांत 90 धावांच्या पुढे गेली होती. पहिला गडी 92 धावांवर बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी ऑली पोप (Ollie Pope) आला. लंचनंतर खेळ सुरु झाल्यावर सिराजने पोपला 22 धावांवर असताना पायचीत (LBW) बाद केले आणि याच विकेटसह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 200 बळींचा टप्पा पूर्ण केला.

2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या सिराजने आतापर्यंत 101 सामने खेळले आहेत. 29.12 च्या सरासरीने त्याने या 200 विकेट्स घेतल्या आहेत. आपल्या कारकिर्दीत त्याने आतापर्यंत 5 वेळा 5 बळी घेण्याचा पराक्रमही केला आहे.

14वा भारतीय वेगवान गोलंदाज

मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 हून अधिक विकेट घेणारा 14वा भारतीय वेगवान गोलंदाज (Fast Bowler) बनला.

  • कसोटी (Test): 117 विकेट्स

  • वन-डे (ODI): 71 विकेट्स

  • टी-20 आंतरराष्ट्रीय (T20I): 14 विकेट्स

सिराजचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील इकॉनमी रेट आतापर्यंत 4.55 असा उत्कृष्ट राहिला आहे. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये (Three Formats) भारतीय संघासाठी प्रमुख गोलंदाजाची भूमिका यशस्वीपणे पार पाडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बँक कर्ज देण्यास मनाई करत असेल तर तक्रार करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Goa News Live Update: रुमडामळच्या ४ अपात्र पंच सदस्यांना १६ ऑगस्टपर्यंत स्थगिती

बाथरुममध्ये ढसाढसा रडला होता विराट कोहली; युजवेंद्र चहलने सांगितला वर्ल्ड कपमधील ‘त्या’ पराभवाचा किस्सा!

Nishaanchi: 'दिल थामिऐ, जान बचाइए'! बाळासाहेब ठाकरेंचा नातू बॉलीवूडमध्ये झळकणार; नुसत्या पोस्टरनेच घातलाय धुमाकूळ

Kidney Infection: किडनी इन्फेक्शन म्हणजे काय? पुरुषांच्या तुलनेत महिलांना सर्वाधिक धोका; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि बचावात्मक उपाय!

SCROLL FOR NEXT