Mohammed Siraj Dainik Gomantak
देश

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये 'सिराज' रचणार इतिहास! एक विकेट घेताच अनिल कुंबळेला सोडणार मागे

Mohammed Siraj Record: मोहम्मद सिराजने इंग्लंडमध्ये आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले असून, त्याने 36 बळी घेतले आहेत.

Manish Jadhav

Mohammed Siraj Record: भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील तीन सामने आतापर्यंत खेळले गेले असून चौथा कसोटी सामना 23 जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळवला जाईल. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. त्याचवेळी, या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला एक अनोखा विक्रम करण्याची संधी असेल. जर त्याने चांगली गोलंदाजी केली तर तो भारताच्या महान गोलंदाजांपैकी एक असलेल्या अनिल कुंबळेला मागे सोडेल.

इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी बळी घेणारे भारतीय गोलंदाज

दरम्यान, इंग्लंडमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज सध्या ईशांत शर्मा आहे. ईशांतने 2011 ते 2021 या काळात इंग्लंडमध्ये 15 कसोटी सामने खेळून 51 बळी घेतले आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह आहे. त्याने इंग्लंडमध्ये 11 सामने खेळून आतापर्यंत 49 बळी घेतले आहेत. बुमराहला ईशांतला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर जाण्याची संधी आहे, पण मोहम्मद सिराजही फार मागे नाही.

सिराज कुंबळेंना मागे टाकणार

मोहम्मद सिराजने इंग्लंडमध्ये आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले असून, त्याने 36 बळी घेतले आहेत. मोहम्मद सिराजच्या बरोबरीनेच अनिल कुंबळेनेही (Anil Kumble) इंग्लंडमध्ये बळी घेतले आहेत. कुंबळेने 1990 ते 2007 या काळात इंग्लंडमध्ये 10 कसोटी सामने खेळून 36 बळी घेतले होते. आता मोहम्मद सिराजने केवळ एक विकेट घेतली, तरी तो कुंबळेला मागे टाकून ही एक विशेष कामगिरी नोंदवेल.

शम्मी आणि कपिल देवही यादीत

इंग्लंडमध्ये (England) सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये ईशांत शर्मा पहिल्या स्थानावर आहे, त्यानंतर जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारताचे महान अष्टपैलू कपिल देव आहेत, ज्यांनी इंग्लंडमध्ये 13 कसोटी सामने खेळून 43 बळी घेतले आहेत. मोहम्मद शमीने इंग्लंडमध्ये 14 सामने खेळून 42 बळी घेतले आहेत. त्यानंतर अनिल कुंबळे आणि मोहम्मद सिराज यांचा नंबर लागतो. या आकडेवारीवरुन मँचेस्टर कसोटीत सिराजच्या कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: जो जिता वही सिकंदर!

Rohit Sharma: 2027 वर्ल्डकपसाठी 'हिटमॅन'ची खास रणनीती! विजय हजारे ट्रॉफीत मुंबईकडून खेळणार, देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुन्हा गाजवणार मैदान

Crime News: फुटबॉल खेळताना मुलांच्या दोन गटांत वाद; अल्पवयीनावर कुत्रा सोडून दांडक्याने मारहाण, आरोपीला अटक

Kadamba Bus Service: कदंब बसप्रवास आता स्वस्त! स्मार्ट कार्डधारकांना 20 टक्के, नियमित प्रवाशांना 30 टक्के सवलत

EPFO WhatsApp Service: आता 'व्हॉट्सअ‍ॅप'वरच मिळणार PF खात्याचा संपूर्ण हिशेब! जुनी बंद पडलेली खातीही होणार ऑटो-सेटल, केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT