Modified Bike Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: 'विषयच हार्ड'! पठ्ठ्यांनी बनवली 6 चाकांची बाईक, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, 'हे टेक्निक देशाबाहेर जाता कामा नये!'

Modified Bike Viral Video: सोशल मीडियाच्या जगात व्हायरल आणि जास्तीत जास्त लाईक्स व व्ह्यूज मिळवण्यासाठी तरुणांमध्ये सध्या मोठी स्पर्धा लागलेली दिसते.

Manish Jadhav

Modified Bike Viral Video: सोशल मीडियाच्या जगात जास्तीत जास्त लाईक्स व व्ह्यूज मिळवण्यासाठी तरुणांमध्ये सध्या मोठी स्पर्धा लागलेली दिसते. यासाठी तरुण नवनवीन प्रयोग करताना दिसतात, जे इंटरनेटवर येताच चर्चेचा विषय ठरतात. असाच एक अनोखा आणि तितकाच मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही तरुणांनी आपल्या कल्पकतेचा वापर करुन एका बाईकला चक्क सहा चाके लावली. ही 'जुगाडू बाईक' पाहून नेटकरी केवळ थक्कच झाले नाहीत, तर अनेकांनी कपाळावर हात मारला. या तरुणांनी बाईकमध्ये केलेले हे मॉडिफिकेशन सध्या सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेत असून त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, रस्त्याच्या कडेला काही तरुण आपल्या मॉडिफाईड बाईकसह उभे आहेत. सहसा बाईकला दोन चाके असतात, मात्र या तरुणांनी आपल्या बाईकच्या दोन्ही चाकांच्या खाली प्रत्येकी दोन-दोन अतिरिक्त चाके जोडली आहेत. यामुळे ही बाईक पूर्णपणे वेगळी आणि जगातील सर्वात अनोखी बाईक वाटत आहे. विशेष म्हणजे, ही सहा चाकांची बाईक रस्त्यावर धावतानाही दिसत आहे. त्यांनी हे मॉडिफिकेशन नक्की कोणत्या तंत्राने केले, हे स्पष्ट झाले नसले तरी सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या उद्देशानेच हा सर्व खटाटोप केल्याचे उघड दिसत आहे. त्यांचा हा प्रयत्न यशस्वीही ठरला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

हा मजेशीर व्हिडीओ 'एक्स' या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला असून त्याला दिलेल्या कॅप्शनने लोकांचे अधिक मनोरंजन केले आहे. कॅप्शनमध्ये गमतीने म्हटले की, "ही कलाकृती कोणी बनवली? हे तरुणच आपल्या देशाचे भवितव्य आहेत. ही कलाकारी देशाबाहेर जाता कामा नये." अवघ्या 14 सेकंदांच्या या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले असून शेकडो लोकांनी तो लाईक केला आहे. हा जुगाड पाहून नेटकरी विविध प्रकारच्या तिरकस आणि विनोदी प्रतिक्रिया देत आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांनी या व्हिडीओची मजा अधिकच वाढवली आहे. एका युजरने उपहासाने म्हटले की, "भावाने बाईकला हेलिकॉप्टर बनवले", तर दुसऱ्या एका युजरने "अशा महान कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे" अशी विनोदी मागणी केली. एका तिसऱ्या युजरने चिमटा काढताना लिहिले की, "किती अफाट कला आहे ही! असे हुन्नरबाज हातच देशाचे खरे भविष्य आहेत." जरी या बाईकचे मॉडिफिकेशन तांत्रिकदृष्ट्या किती सुरक्षित आहे यावर शंका असली, तरी या तरुणांच्या जुगाडू वृत्तीने आणि सोशल मीडियावरील (Social Media) प्रसिद्धीच्या हव्यासाने सर्वांना हसायला भाग पाडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT