नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी (Nobel laureate Abhijit Banerjee) यांनी केंद्र सरकारच्या (Central Government) वैक्सीन नीती (Vaccine Policy) आणि पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने होणाऱ्या वाढीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीत कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी चर्चा केली आहे.
अभिजित बिनायक बॅनर्जी म्हणाले की, सर्वात मोठी समस्या ही आहे की केंद्र सरकार देशाला लस पुरवू शकत नाही. पुरेशा लसींचा पुरवठा केंद्र सरकारकडून करण्यात आला असता तर ही अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली नसती. केंद्र सरकारने संपूर्ण देशाला कोरोना लस पुरविण्याचे वचन दिले मात्र सरकार अपयशी ठरले आहेत. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध करुन दिल्या नाहीत असा, आरोप मोदी सरकारवर केला आहे.
अभिजित बॅनर्जी यांनी बंगालच्या प्रयत्नांचे कौतुक केले
अभिजित बॅनर्जी पुढे म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये कोरोना काळात खूप चांगले प्रयत्न झाले आहेत. ऑक्सिजनची कमतरता नाही. राज्यात तपास यंत्रणा योग्य कार्य करत आहेत. गावात डॉक्टर सुद्धा आहेत. तसचे त्यांना पुरेसे प्रशिक्षण देण्यात आले आहे. बॅनर्जी यांना अर्थव्यवस्थेबद्दल विचारले असता, आपल्या राज्यातील बरेच लोक बाहेरच्या राज्यांमध्ये काम करतात. परिणामी, एकटे राज्य काहीही करु शकत नाही. त्यामुळे जर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था योग्य ठिकाणी पोहोचली नाही तर आपण काहीही करु शकणार नाही. देशाचा GDP 6ते 7 टक्के आपेक्षित आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवरुन केंद्राने टीका केली
पेट्रोल उत्पादनांच्या किंमती वाढवण्याच्या संदर्भात ते म्हणाले की, मोदी सरकार पेट्रोल आणि डिझेलवर जास्त कर आकारणी करत आहे. त्यामुळे देशातील मध्यमवर्गीयांना महागाईचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलवर सेस लावून सामान्य माणसावर अप्रत्यक्ष दबाव टाकणे योग्य नाही. गरज भासल्यास केंद्र सरकारने अधिक नोटा छापल्या पाहिजेत. ज्याप्रमाणे युरोप किंवा अमेरिकेच्या वेगवेगळ्या देशांनी या अर्थव्यवस्थेच्या काळात अधिक नोटा छापून अर्थव्यवस्था हाताळली आहे, त्याचप्रमाणे केंद्राने अधिक नोटा छापून देशाची अर्थव्यवस्था वाचवण्याचा विचार केला पाहिजे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.