Crime News Dainik Gomantak
देश

Bihar Crime: चेटकीण असल्याचा संशय, 250 लोकांनी घेरुन एकाच घरातील 5 जणांना ठार केले, पेट्रोल टाकून मृतदेह जाळले

Bihar Crime News: जवळपास २५० लोकांनी कुटुंबातील पाच सदस्यांना घेरले, त्यांना मारहाण करुन नंतर जाळून टाकले.

गोमंतक ऑनलाईन टीम

बिहार: प्रसिद्ध उद्योगपती गोपाळ खेमका यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना, बिहारच्या पूर्णिया येथून आणखी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एकाच कुटुंबातील ५ जणांची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंधश्रद्धेतून ही हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. जादूटोण्याचा हा प्रकार असल्याचे सांगितले जात आहे.

राजीगंज पंचायतीच्या तातेगामा येथे ही घटना घडली. या प्रकरणी ५ जणांवर जादूटोण्याचा आरोप करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, जवळपास २५० लोकांनी कुटुंबातील पाच सदस्यांना घेरले, त्यांना मारहाण करुन नंतर जाळून टाकले. इतकेच नाही तर त्यानंतर त्यांचे मृतदेह देखील गायब करण्यात आले. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, एसपी, एएसपी आणि विविध पोलिस ठाण्यांचे पोलिस घटनास्थळी उपस्थित आहेत.

बाबूलाल ओरांव, त्यांची पत्नी सीता देवी, आई काटो मासोमत, मुलगा मनजीत ओरांव आणि सून राणी देवी अशी मृत नागरिकांची नावे आहेत. घरात चेटकीण असल्याच्या संशयावरून मारे २५० लोकांनी त्यांना घेरले आणि त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी सध्या दोघांना ताब्यात घेतले आहे.

रात्री ३:०० वाजता गावकऱ्यांनी आदिवासी बाबूलाल ओरांव यांच्या घरच्यांना घेरुन चेटकीण असल्याच्या संशयावरुन मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यावर पेट्रोल शिंपडून त्यांना जाळून मारले. त्यानंतर त्यांनी मृतदेह लपवून ठेवले.

विविध पोलिस ठाण्यांचे पोलिस घटनास्थळी उपस्थित असून, याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपी रामदेव ओरांव यांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा पुतण्याही आजारी पडला, त्यांचा असा समज झाला की सीता देवी, काटो देवी यांच्यामुळे ते आजारी पाडले होते. यातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Beef Seized: बेळगावातून गोव्यात बेकायदेशीर मांसाची तस्करी, 1930 किलो गोमांस जप्त; दोघे अटकेत

Viral Video: आधी पठ्ठ्यानं रॅपिडो रायडरला फोन करुन बोलावलं अन् नंतर असं काम करुन घेतलं... सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Fashion Factory Exchange Festival: जुने कपडे द्या अन् ब्रँडेड कपडे घ्या...! मुकेश अंबानींचं मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट; कसं ते जाणून घ्या

Heavy School Bag: मुलांच्या पाठीवर 'दप्तराचे' आणि डोक्यावर 'अभ्यासाचे' ओझे का वाढते आहे?

Sanjog Gupta: आणखी एक भारतीय पोहोचला ICCमध्ये! संजोग गुप्ता बनले नवे CEO; 2500 उमेदवारांमधून निवड

SCROLL FOR NEXT