mob burns assam batadrava police station assaults cops after alleged custodial death  Dainik Gomantak
देश

हल्लेखोरांनी पोलिस स्टेशनला लावली आग; 2 पोलिस जखमी, व्हिडिओ व्हायरल

पोलिस कर्मचारी निलंबित

दैनिक गोमन्तक

आसाममध्ये जमावाने पोलिस स्टेशन जाळले. यावेळी दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले. शफीकुल इस्लाम नावाच्या व्यक्तीचा पोलीस ठाण्यात मृत्यू झाल्याचा संशय जमावाला आला. ही घटना नौगाव जिल्ह्यातील बटाद्रवा ठाण्याची आहे. हल्ल्यादरम्यान महिलांसह सुमारे 2,000 हल्लेखोरांचा जमाव असल्याचा अंदाज आहे. ही घटना शनिवार (21 मे 2022) ची आहे. आतापर्यंत 3 हल्लेखोरांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. (mob burns assam batadrava police station assaults cops after alleged custodial death)

घटनेची माहिती देताना आसाम पोलिसांचे डीजीपी म्हणाले, “20 मे 2022 रोजी रात्री 9.30 च्या सुमारास पोलिसांना एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक रस्त्यावर पडल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून 39 वर्षीय शफीकुल इस्लामला बटाद्रवा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.

दुसऱ्या दिवशी त्याला पत्नीच्या ताब्यात देऊन सोडून देण्यात आले. शफीकुलच्या पत्नीने त्याला जेवण व पाणी दिले. नंतर शफीकुलने सांगितले की त्यांची प्रकृती खालावत आहे, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. दुर्दैवाने त्याचा तिथेच मृत्यू झाला."

डीजीपी पुढे म्हणाले, “आम्ही हा मृत्यू गांभीर्याने घेतला आणि पोलिस स्टेशनच्या ओसीला निलंबित केले. पोलिस ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून काही चूक झाली असेल, तर त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.

यानंतर डीजीपींनी सांगितले की, दुसऱ्या दिवशी काही समाजकंटकांनी कायदा हातात घेतला आणि पोलिस स्टेशन जाळले. त्यांच्या मते या समाजकंटकांमध्ये तरुण, महिला, पुरुष आणि वृद्धांचा समावेश होता. त्यांच्याकडून पोलिसांवर सामूहिक हल्ला करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Israel-Hamas War: क्रीडाविश्वात खळबळ, इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू

Mopa Airport: उबर अ‍ॅपद्वारे भाडे घेणाऱ्या 4 जणांवर वाहतूक विभागाची कारवाई

Bicholim: डिचोलीत दोन विद्यार्थ्यांमध्ये मारामारी, व्हॉट्सअप ग्रुपवर चॅटिंग करताना झाला होता वाद, एकास अटक

Panjim: "गोव्यातील कलाकारांनाही मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी द्यावी", CM सावंतांचे प्रतिपादन

वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाच्या जमिनीचा वाद, सरकारने हस्तक्षेप करावा; पालकांची मागणी

SCROLL FOR NEXT