Vidahn Bhavan
Vidahn Bhavan  Dainik Gomantak
देश

महाराष्ट्र विधानसभेतील 12 आमदारांच्या निलंबनाचे प्रकरण; सुप्रीम कोर्टानं निर्णय ठेवला राखून

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र विधानसभेच्या 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या 12 आमदारांच्या याचिकेवरचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला. 5 जुलै 2021 रोजी विधानसभेने आवाजी मतदानाने ठराव मंजूर करून या भाजपच्या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केले होते. खंडपीठाचे अध्यक्ष न्या. ए. एम. खानविलकर यांनी दोन्ही पक्षांना आठवड्याभरात लेखी स्वरुपात माहिती देण्याचे निर्देश दिले. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. अधिवेशनादरम्यान विधानसभा (Vidhan Bhavan)अध्यक्षांसोबत गैरवर्तन केल्यानं त्यांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं होतं.

सभासदाला पुढील सत्रात उपस्थित राहण्याची परवानगी का दिली जाऊ शकत नाही याचे एक 'मजबुत' कारण असावे. पीठासीन अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी महाराष्ट्र विधानसभेतून एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (Bjp) 12 आमदारांनी दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. हा निर्णय किती तर्कसंगत आहे हा खरा मुद्दा असल्याचे ते म्हणाले.

'निलंबन हे बेदखल करण्यापेक्षाही वाईट'

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी असे म्हटले होते की, विधानसभेतून एक वर्षासाठी निलंबन हे हकालपट्टीपेक्षा वाईट आहेत. यामुळे सभागृहात (Vidahn Bhavan)प्रतिनिधित्व करण्याच्या मतदारसंघाच्या अधिकारावर परिणाम होतो. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एएम खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र तर्फे उपस्थित ज्येष्ठ वकील ए सुंदरम यांना सांगितले की, “निलंबन करण्याच्या निर्णयामागे काही हेतू असला पाहिजे. त्या सदस्याला पुढच्या सत्रातही सहभागी होऊ देऊ नये यासाठी ठोस कारण असले पाहिजे.“

'या' सदस्यांना करण्यात आलं होतं निलंबित

आशिष शेलार,(Ashish Shelar) गिरीश महाजन, अतुल भातखळकर, बंटी भांगडीया, संजय कुटे, अभिमन्यू पवार, पराग आळवणी, हरीश पिंपळे, योगेश सागर, जयकुमार रावत, राम सातपुते आणि नारायण कुचे हे 12 निलंबित सदस्य आहेत. या आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्याचे संसदीय कार्यमंत्री अनिल परब (Anil Parab)यांनी मांडला होता तसेच आवाजी मतदानाने तो मंजूर करण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : दोन्‍ही जागा ‘इंडिया’च जिंकणार! विरियातो फर्नांडिस

Siolim News : देशाच्या अधोगतीस काँग्रेस जबाबदार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Goa News : राज्यात ७० टक्क्यांहून अधिक मतदान अपेक्षित! सदानंद शेट तानावडे

Crime News : काणकोणात बारचालकाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाजवळ गावठी बॉम्ब, काडतुसेही सापडल्याने तर्कवितर्क

Santhacruz Health Centre : सांताक्रुझ येथील शहरी आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा; रुग्णांना मारावे लागतात हेलपाटे

SCROLL FOR NEXT