Assam Rifle Team And State Police Arrested 5 Citizens Of Myanmar: मिझोरामच्या 40 विधानसभा जागांवर झालेल्या मतमोजणीनंतर अवघ्या 3 दिवसांनी राज्य पोलीस आणि आसाम रायफल्सने मोठी कारवाई केली आहे.
एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत अधिकार्यांनी 18 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे हेरॉईन आणि 1.21 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. या कारवाईत 5 जणांना अटकही करण्यात आली आहे.
दरम्यान, आसाम रायफल्स आणि राज्य पोलिसांच्या तुकड्या मिझोरामच्या चंफई जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या संयुक्त ऑपरेशन करत होत्या. या कारवाईत पोलिस आणि आसाम रायफल्सच्या पथकाने 5 नागरिकांकडून (Citizens) 18.30 कोटी रुपयांच्या हेरॉइनसह 1.21 कोटी रुपयांची रोकडही जप्त केली. या कारवाईची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
आसाम रायफल्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना ठोस माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी राज्य पोलिसांच्या पथकासह मिझोराम-म्यानमार सीमेवरील जोटे आणि जोखावथर गावात शुक्रवारी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत त्यांना 2.61 किलो ड्रग्ज सापडले, ज्याची बाजारातील किंमत 18.30 कोटी रुपये आहे.
दुसरीकडे, हेरॉईन व्यतिरिक्त त्यांच्याकडून 500, 200, 100 आणि 50 रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची मोजणी केली असता ते 1.21 कोटी असल्याचे समोर आले. या कारवाईत म्यानमारच्या (Myanmar) पाच नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
तसेच, 40 सदस्यीय मिझोरम विधानसभेसाठी मंगळवारी मतदान झाल्यानंतर तीन दिवसांनी शुक्रवारी हे ऑपरेशन सुरु करण्यात आले होते. याबाबतची माहिती आसाम रायफलच्या पथकाने शनिवारी दिली. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.