Mirchi Baba
Mirchi Baba Dainik Gomantak
देश

'काली'च्या दिग्दर्शकाचा शिरच्छेद करणाऱ्याला 20 लाखांचे बक्षीस, मिर्ची बाबाने केले जाहीर

दैनिक गोमन्तक

Mirchi Baba: हरिद्वारच्या श्री पंचायती निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी वैरागानंद गिरी महाराज धर्मगुरु मिर्ची बाबा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हिंदू देवतांचा अपमान करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 20 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. महामंडलेश्वर यांचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये ते एका षड्यंत्राखाली हे घडत असल्याचं सांगत आहेत. त्यांचा शिरच्छेद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. (Mirchi Baba Announced 20 Lakh Reward For Beheading Kali Director Leena)

दरम्यान, काली माँ चित्रपटाच्या वादग्रस्त पोस्टरवर मिर्ची बाबा म्हणाले की, काही लोक सातत्याने हिंदू (Hindu) धर्माला बदनाम करत आहेत. आता या घटनेमधून माँ कालीचा अपमान झाला आहे. निरंजनी आखाड्याचा संत असल्याने मी जाहीर करतो की, असे चित्रपट बनवणाऱ्यांचा शिरच्छेद करणाऱ्याला मी 20 लाख रुपये देईन.

दुसरीकडे, 'आश्रम वेब सीरिजचे निर्माते हिंदू धर्मावर सातत्याने टीका करत आहेत. असे चित्रपट (Movies) बनवणाऱ्यांचा शिरच्छेद करणाऱ्याला मी 20 लाख रुपयांचे बक्षीस देईन. आंतरराष्ट्रीय षड्यंत्राखाली अशी कामे केली जात आहेत. आता शिरच्छेद केल्याशिवाय विश्वास बसणार नाही,' असे मिर्ची बाबा म्हणाले. सर्वत्र कायदेशीर कारवाई सुरु आहे. ठिकठिकाणी अर्ज दिले जात आहेत, मात्र कायद्याची पूर्ण अंमलबजावणी होत नाही, असेही बाबा म्हणाले.

शिवाय, या लोकांना पकडून कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'काली' या चित्रपटाच्या पोस्टरवरुन वाद निर्माण झाला आहे. यामध्ये माँ काली सिगारेट ओढताना दाखवण्यात आली होती. यासोबतच त्यांच्या एका हातात एलजीबीटी समुदायाचा ध्वजही दिसत आहे. हा चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई (Leena Manimekalai) यांचा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

SCROLL FOR NEXT