Crime News  Dainik Gomantak
देश

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये आणखी एका स्थलांतरित मजुरावर हल्ला; संशयित दहशतवाद्याने झाडली गोळी

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये आणखी एका स्थलांतरित मजुरावर जीवघेणा हल्ला झाला आहे.

Manish Jadhav

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये आणखी एका स्थलांतरित मजुरावर जीवघेणा हल्ला झाला आहे. रिपोर्टनुसार, शोपियान भागात संशयित दहशतवाद्यांनी स्थलांतरित मजुरांवर गोळीबार केला. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसराची नाकेबंदी केली असून सर्च ऑपरेशन सुरु आहे. रिपोर्टनुसार, पीडित व्यक्तीचे नाव परमजीत सिंग असे असून तो दिल्लीचा रहिवासी आहे.

परमजीत कार घेऊन शोपियामध्ये आला होता. सोमवारी संध्याकाळी उशिरा दहशतवाद्यांनी त्याला लक्ष्य करुन गोळीबार केला. त्याच्यावर जवळून गोळी झाडण्यात आली. गोळीबाराचा आवाज ऐकून लोकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

दरम्यान, ही बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा जम्मू-काश्मीर पोलिसांनी 100 कुख्यात गुन्हेगारांची लिस्ट तयार केली आहे. कठुआ गोळीबारात एक उपनिरीक्षक शहीद झाल्यानंतर आणि एक गुन्हेगार मारला गेल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी लिस्ट शेअर केली होती. त्यात गेल्या 15 वर्षांत वेगवेगळ्या जिल्ह्यातून सक्रिय असलेल्या 100 हून अधिक गुन्हेगारांची नावे आहेत. यामधील 116 सक्रिय गॅंगस्टर, हिस्ट्री शीटर्स आणि कुख्यात गुन्हेगारांच्या नावांचा समावेश असल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

त्यांनी पुढे सांगितले की, 'पंजाब, बिहार आणि उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांमधूनही पोलिस आणि गुन्हेगार यांच्यातील चकमकीच्या घटना समोर येत आहेत. कठुआ गोळीबारामुळे पोलीस सतर्क झाले असून कुख्यात गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT Campus Farmagudi: 'आयआयटी'ची एवढी काळजी असेल तर स्वतःची जमीन द्या! विजय सरदेसाई यांचा सुदिन ढवळीकरांना टोला

घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी, 12 हून अधिक ठिकाणी पडझड; सत्तरीला चक्रीवादळाचा तडाखा! 25 लाखांहून अधिक नुकसान

Karnataka Tourist Death Case: एमबीएची पदवी... अन् मोहजालाचा खेळ! मृत संदीपची 'चेन' अक्षताच्या गळ्यात; तपासात धक्कादायक माहिती समोर

Horoscope: रविवार ठरणार खास! 'या' राशींना आर्थिक लाभ आणि यशाचे संकेत, व्यवसाय, नोकरी आणि प्रेमजीवनात मोठे बदल होणार

Indian Forest: जंगलातील आभूषणांची पर्यावरणीय साखळी

SCROLL FOR NEXT