Mehbooba Mufti Dainik Gomantak
देश

भाजपला मुस्लिमांची सर्व चिन्हे नष्ट करायची आहेत: मेहबूबा मुफ्ती

भारतीय मुस्लिमांसाठी केवळ भारतीय असणे पुरेसे नाही, तर त्यांनी भाजपमय असणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

हिजाबबाबत कर्नाटकात सुरू असलेला वाद आता देशभर गाजला आहे. या वादावरून विरोधक सातत्याने भाजपवर हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनीही भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, मला भीती वाटते की भाजप फक्त हिजाबवर थांबणार नाही तर त्यांना मुस्लिमांची सर्व चिन्हे नष्ट करायची आहेत. मेहबुबा इथेच थांबल्या नाहीत तर पूढे त्या म्हणाल्या की, भारतीय मुस्लिमांसाठी केवळ भारतीय असणे पुरेसे नाही, तर त्यांनी भाजपमय असणे आवश्यक आहे.

एएनआय न्यूज एजन्सीनुसार, मेहबुबा मुफ्ती (Mehabooba Mufti) यांनी रविवारी श्रीनगरमध्ये सांगितले की जम्मू आणि काश्मीर हा राजकीय मुद्दा आहे, परंतु भाजप ला त्याला सामुदायिक प्रकरण बनवायचे आहे. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीर हा राजकीय मुद्दा आहे. कलम 370 रद्द केल्याने हा प्रश्न सुटला नाही तर तो अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. आज नाही तर उद्या केंद्र सरकारला याबाबत पाकिस्तानशी चर्चा करावी लागेल, असेही त्या म्हणाल्या. जम्मू-काश्मीरमध्ये जितका त्रास आणि रक्त सांडले जाईल तितका भाजपला फायदा होईल हे खरे आहे.

त्याचवेळी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी हिजाब वादाबद्दल सांगितले की, देश हा सर्वांसाठी समान आहे, तुम्हाला काय घालायचे आहे, काय खायचे आहे आणि कसे जगायचे आहे याचा तुम्हाला अधिकार आहे, प्रत्येकाचा स्वतःचा धर्म आहे. ज्या कोणत्या धर्मावर हल्ला होत आहेत हे सर्व कट्टरवादी आहेत ज्यांना याचा वापर करून निवडणूक जिंकायची आहे.

कर्नाटकात सोमवारपासून शाळा सुरू होणार आहेत

दरम्यान, कर्नाटकच्या (Karnataka) उडुपी जिल्हा प्रशासनाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 अंतर्गत सोमवारपासून 19 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू होणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या कारवाईकडे पाहिले जात आहे. हिजाब-केसरी शाल वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळांना सुट्टी जाहीर केली होती. हा आदेश 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहील.

उपायुक्त एम कुर्मा राव यांना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी हायस्कूलच्या 200 मीटरच्या परिघात कलम 144 लागू करण्याची विनंती केली होती. या आदेशानुसार, शाळांच्या या परिघात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी असेल. निदर्शने आणि रॅलींवर बंदी असेल. घोषणाबाजी करणे, गाणी म्हणणे किंवा भाषण करणे यावरही कडक बंदी असेल.

शाळा पुन्हा सुरू झाल्या की शांतता प्रस्थापित होईल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविवारी राज्यभरात दहावीपर्यंतच्या उच्च माध्यमिक शाळा पुन्हा सुरू होण्याच्या एक दिवस आधी शांतता आणि सामान्य स्थिति पूर्ववत होईल असा विश्वास व्यक्त केला. राज्यात हिजाबवरून सुरू असलेल्या वादामुळे या शाळा बंद करण्यात आल्या होत्या. प्री-युनिव्हर्सिटी आणि डिग्री कॉलेज पुन्हा सुरू करण्याबाबत परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे बोम्मई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला दिवसाढवळ्या लुबाडले, लंपास केली सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

SCROLL FOR NEXT