Mehbooba Mufti  Dainik Gomantak
देश

Mehbooba Mufti: भाजपने काश्मिरचा अफगाणिस्तान केला; पॅलेस्टाईनची स्थिती आमच्यापेक्षा चांगली...

बुलडोझर कारवाईवरून माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींची टीका

Akshay Nirmale

Mehbooba Mufti: जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मिरमधील बुलडोझर कारवाईवरून केंद्रातील भाजप सरकारवर जहरी टीका केली आहे.

बुलडोझरने घरे पाडून भाजपने काश्मिरचे अफगाणिस्तानात रूपांतर केले आहे. आमच्यापेक्षा पॅलेस्टाईनची स्थिती चांगली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

जम्मू आणि काश्मिरमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेवरून केंद्र सरकारवर निशाणा साधत मुफ्ती म्हणाल्या की, बुलडोझर कारवाईमुळे काश्मीर आज अफगाणिस्तानसारखा बनला आहे.

भाजपच्या राजवटीत जम्मू-काश्मीरची आर्थिक स्थिती बिघडली आहे. जम्मू आणि काश्मीर हे एकमेव राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे जेथील लोक कधीही रस्त्यावर झोपले नाहीत, जिथे लोक मोफत रेशनसाठी रांगेत उभे राहिले नाहीत.

पण भाजप सत्तेत आल्यापासून दारिद्र्यरेषेच्या वर असणारे नागरिकही आता दारिद्य्ररेषेखाली आले आहेत. भाजपला जम्मू-काश्मीरला पॅलेस्टाईन आणि अफगाणिस्तानसारखे बनवायचे आहे.

मुफ्ती म्हणाल्या, पॅलेस्टाईनची स्थिती अजूनही चांगली आहे. किमान लोक बोलतात. पण काश्मिरमध्ये ज्याप्रकारे लोकांची छोटी घरे पाडण्यासाठी बुलडोझरचा वापर केला जात आहे, त्यातून दिसते की काश्मीरची स्थिती अफगाणिस्तानपेक्षाही वाईट होत आहे. छोट्या लोकांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्यात काय अर्थ आहे?

मुफ्ती म्हणाल्या, जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा दावा करतात की अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान गरिबांच्या घरांना हात लावला जाणार नाही, परंतु त्यांचे आदेश कुणी ऐकत नाही. टिनशेडची घरेही पाडली जात आहेत.

भाजपच्या 'एक संविधान, एक संविधान, एक प्रधान' या घोषणेने 'एक देश, एक भाषा, एक धर्म' निर्माण केला आहे. भाजप संख्याबळाच्या जोरावर संविधानावरच बुलडोझर फिरवत आहे. कलम 370 रद्द केल्यापासून जे काही घडले आहे तो आमच्या ओळखीवर हल्ला आहे. अर्थव्यवस्था, नोकऱ्या, आमच्या जमिनींवर हल्ला आहे.

दरम्यान, मुफ्ती या अलीकडच्या काळात भाजपच्या पाठिंब्यावरच मुख्यमंत्री बनल्या होत्या. 2019 पुर्वी पीडीपी आणि भाजप हेच पक्ष सत्तेत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM Pramod Sawant: 'आमच्या मंत्रिमंडळात तीन ओबीसी मंत्री...', राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री सावंतांचं वक्तव्य

Goa Assembly Session: गोव्यात लवकरच सहकारी संस्थांसाठी ‘नवा कायदा’ , महाराष्ट्रातील MOFAच्या धर्तीवर सावंत सरकारचा मोठा निर्णय!

धूम्रपान करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! स्लिप डिस्कचा वाढला धोका, संशोधनातून धक्कादायक खुलासा; जाणून घ्या लक्षणे आणि तज्ञांचा सल्ला

ऐन चतुर्थीच्या तोंडावर असोला नारळ महागला, लोकांमध्ये चिंता; Watch Video

Goa Agriculture: काजू बागायतीत भाजीपाला, फळाफुलांचा मळा; पार्सेतील शेतकरी दाम्पत्याचा अभिनव प्रयोग

SCROLL FOR NEXT