Mehbooba Mufti: BJP divide Jammu-Kashmir by cast & religion  Dainik Gomantak
देश

भाजपने जम्मू -काश्मीरचं धर्माच्या आधारे विभाजन केलं,मेहबूबा मुफ्ती यांचा आरोप

मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी मंगळवारी सांगितले की, सरकारने जम्मू -काश्मीर हा प्रदेश बाहेरील लोकांना विक्रीसाठी ठेवला आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय जनता पक्षाने (BJP) जम्मू -काश्मीरमधील (Jammu-Kashmir) लोकांना धार्मिक धर्तीवर विभाजित केल्याचा आरोप पीडीपी (PDP) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) आहे. त्या म्हणाल्या की केंद्र सरकारने (Central Government) हा केंद्रशासित प्रदेश विक्रीसाठी ठेवला आहे. मेहबूबा यांनी मंगळवारी सांगितले की, सरकारने जम्मू -काश्मीर हा प्रदेश बाहेरील लोकांना विक्रीसाठी ठेवला आहे. भाजपची अशी उच्च आहे की जम्मू -काश्मीरमधी लोक दिवाळखोर व्हावेत जेणेकरून आम्हाला इतर राज्यांवर व बाहेरील लोकांवर अवलंबून राहावे लागेल. (Mehbooba Mufti: BJP divide Jammu-Kashmir by cast & religion)

पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) अध्यक्षांनी दावा केला की, जम्मू-काश्मीरमध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेले प्रकल्प केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने बंद केले आहेत. "उत्पादन शुल्क अंतर्गत दारू व्यवसायाचे कंत्राट बाहेरच्यांना देण्यात आले आहेत. जम्मू -काश्मीरचे लोक दारूचे सेवन करतील, परंतु त्याचे आर्थिक फायदे बाहेरील लोकांना जातील.आणि हे सगळे भाजपामुळे होत आहे." असा थेट आरोप करत त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी दावा केला की, खाण करारांसह सर्व मोठे प्रकल्प बाहेरच्यांना देण्यात आले आहेत. जम्मूतील व्यापाऱ्यांनी जम्मूमध्ये रिलायन्स रिटेल स्टोअर उघडण्याच्या विरोधात बुधवारी बंदची हाक दिली आहे, ज्याला मेहबूबा पाठिंबा देत आहेत. ते म्हणाले की अशा दुकानांमुळे आमच्या लोकांचे लहान व्यवसाय नष्ट होतील.

"आपल्याकडे देशात जे काही आहे ते सारे भाजप सरकार कॉर्पोरेट घराण्यांना विकत आहेत." जम्मू -काश्मीरमध्ये गुंतवणूक येत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना मेहबूबा म्हणाल्या, "प्रथम. आम्हाला जी गुंतवणूक मिळाली होती ती नष्ट झाली असून जम्मू काश्मीरमधील सारे उद्योग व्यवसाय त्यांचे युनिट बंद करून परत गेले आहेत.

"जम्मू आणि काश्मीर ही एक प्रयोगशाळा आहे जिथे ते तपासणी करत आहेत विभाजित करा आणि राज्य करा हे धोरण भाजप येथे अवलंबवत आहे . त्यानंतर हे धोरण इतर राज्यांमध्ये लागू केले जाईल. एक सरदारजी खलिस्तानी बनतात, आम्ही पाकिस्तानी ब्रँडेड होतो, भाजपाचे लोक फक्त स्वतःलाच हिंदुस्थानी म्हणवतात.असे सांगत पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा भाजपवर शरसंधान साधले आहे.

यासह, त्यांनी दावा केला की केंद्रातील विद्यमान सरकारकडे जम्मू -काश्मीरबाबत कोणतेही स्पष्ट धोरण नाही. मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की "नेहरूजी आणि वाजपेयीजींची काश्मीरबद्दलची दृष्टी होती. आर्थिक, राजकीय आणि भावनिक आघाडीवर त्यांना काय करायचे आहे हे त्यांना माहित होते ... या सरकारकडे दृष्टी नाही. "

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: नशिबाचा तारा चमकणार! सूर्य-गुरुची दुर्मिळ युती 'या' 5 राशींना करणार मालामाल; करिअरमध्ये प्रगती अन् पदोन्नतीचा योग

IND vs SA 4th T20: लखनौत टीम इंडियाला मोठा झटका! उपकर्णधार शुभमन गिल प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर; कोणाला संधी?

Goa Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव प्रकरणात मोठी अपडेट! लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Crime: गोव्यातील 16 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करुन लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातील 39 वर्षीय नराधमाचा कोर्टाने फेटाळला जामीन

Goa News: "गोव्यात 100 हून अधिक बेकायदेशीर क्लब"

SCROLL FOR NEXT