Bhagwant Mann & Arvind Kejriwal Dainik Gomantak
देश

''ड्रग ओव्हरडोस'', आठवडाभरात 10 जणांचा मृत्यू; 'आप' सरकारवर विरोधकांचा घणाघात

सात अमली पदार्थ तस्करांना अटक केल्यानंतर एका दिवसातच पोलिसांची (Police) ही कारवाई झाली आहे.

दैनिक गोमन्तक

यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सरपंच पत्नीसह आम आदमी पक्षात सामील झालेल्या एका व्यक्तीला गुरुवारी तरनतारनमधील खेमकरन येथून 30 ग्रॅम हेरॉईनसह अटक करण्यात आली. सात अमली पदार्थ तस्करांना अटक केल्यानंतर एका दिवसातच पोलिसांची (Police) ही कारवाई झाली आहे. (medicine overdose kills 10 people in Punjab in one week accuses AAP government)

दरम्यान, फरीदकोटमधील रेल्वे ट्रॅकवर खुलेआम ड्रग्ज विकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सात ड्रग तस्करांना पकडले. जसवंत सिंग याला पोलिसांनी पडझरी गावातून अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये झाबळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'आप'वर विरोधकांनी घणाघात

द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, जसवंत यांच्या पत्नी काँग्रेसच्या तिकिटावर दशमेश नगरमधून सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हे जोडपे आपमध्ये सामील झाले होते. खेमकरनमधील आपचे तेव्हाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सर्वन सिंग धुन यांनी जसवंत पक्षात सामील झाल्याचे फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले होते.

तसेच, शिरोमणी अकाली दल बादलचे माजी आमदार विरसा सिंग वालटोहा यांनी गुरुवारी जसवंत यांचा आप आमदार सर्वन सिंग धुन यांच्यासोबतचा फोटो पोस्ट शेअर केला होता. त्यांनी सोशल मीडियावर एफआयआरची एक कॉफी देखील शेअर केली होती.

या आरोपांवर 'आप' चे खदूर साहिब लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी बलजीत सिंह खैरा म्हणाले, "निवडणुकीपूर्वी अनेकांनी 'आप'मध्ये प्रवेश केला. त्यांची ओळखपत्रे तपासायला वेळ नव्हता. मात्र कोणी गैरकृत्य करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. 'आप' सरकारसाठी अंमली पदार्थांचा धोका आता मोठी डोकेदुखी ठरत आहे.

अंमली पदार्थांचा व्यापार रोखण्यात सत्ताधारी अपयशी?

2 मे रोजी, आप चे फरीदकोटचे आमदार गुरदित सिंह सेखोन यांनी आरोप केला की, माझ्या मूळ गाव मचाकी खुर्दमध्ये, अमली पदार्थ तस्करांना सामाजिक कार्यकर्ते बलजीत सिंग यांनी रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्यावर हल्ला केला.

तेव्हा सेखों म्हणाले, “अमली पदार्थ तस्करांच्या टोळ्या आहेत. या धंद्यामध्ये भरपूर पैसा गुंतलेला आहे. या आघाडीत अनेक ताकदवान लोक आहेत. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आम्ही एक टीम तयार केली होती, आणि बलजीत त्याचा सदस्य होता. आमच्याच लोकांना मारहाण होत असेल तर आम्ही जनतेला काय न्याय देऊ शकतो.''

विधानसभा निवडणुकीपूर्वी, AAP चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी असा दावा केला होता की, 'जर आमचे सरकार सत्तेत आल्यास सहा महिन्यांत अंमली पदार्थ तस्करांचा नायनाट करु.' सरकारकडून फारशी कारवाई झालेली नसताना एक बदल दिसून आला आहे, तो म्हणजे लोक अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध आवाज उठवू लागले आहेत. अलीकडच्या काळात, लोकांनी कथित अमली पदार्थ तस्करांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

SCROLL FOR NEXT