Mathura  File Photo
देश

Mathura: मोठी बातमी! श्री कृष्णजन्मभूमी प्रकरणी शाही ईदगाहचे सर्वेक्षण करण्याचे न्यायालयाचे आदेश

वाराणसीच्या ज्ञानवापी प्रकरणानंतर आता श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद समोर आला आहे.

Pramod Yadav

Mathura: मथुरेच्या दिवाणी न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण आणि शाही ईदगाहच्या वादग्रस्त जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. वाराणसीच्या ज्ञानवापी प्रकरणानंतर आता श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद समोर आला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणीसाठी 20 जानेवारी रोजी होणार आहे. अमीन यांना संबंधित अहवाल न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

(Mathura Court Orders Survey Of Shahi Idgah Mosque After January 2)

काय आहे वाद?

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीचा वाद अनेक दशके जुना आहे. मथुराचा हा वाद एकूण 13.37 एकर जमिनीच्या मालकीशी संबंधित आहे. 12 ऑक्टोबर 1968 रोजी श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संस्थानने शाही मशीद इदगाह ट्रस्टशी करार केला. या करारात 13.7 एकर जागेवर मंदिर आणि मशीद दोन्ही बांधण्याची चर्चा करण्यात आली होती. विशेष म्हणजे, श्रीकृष्ण जन्मस्थानकडे 10.9 एकर जमिनीचा मालकी हक्क आहे तर शाही इदगाह मशिदीकडे अडीच एकर जमिनीचा मालकी हक्क आहे.

हिंदू पक्षकारांनी शाही इदगाह मशीद बेकायदेशीरपणे कब्जा करून बांधली असून, या जमिनीवर दावाही केला आहे. शाही ईदगाह मशीद हटवून ही जमीन श्रीकृष्ण जन्मभूमीला देण्याची मागणी हिंदूंकडून होत आहे.

औरंगजेबाने श्रीकृष्णाच्या जन्मस्थानावर बांधलेले प्राचीन केशवनाथ मंदिर नष्ट केले आणि त्याच ठिकाणी 1669-70 मध्ये शाही ईदगाह मशीद बांधली, असा दावा केला जातो. यानंतर 1770 मध्ये गोवर्धन येथे मुघल आणि मराठ्यांमध्ये युद्ध झाले. या युद्धात मराठ्यांचा विजय झाला. विजयानंतर मराठ्यांनी पुन्हा मंदिर बांधले. 1935 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने बनारसचे राजा कृष्ण दास यांना 13.37 एकर जमीन दिली. 1951 मध्ये श्री कृष्ण जन्मभूमी ट्रस्टने ही जमीन संपादित केली.

न्यायालयाने काय आदेश दिले?

मथुरा दिवाणी न्यायालयात 13.37 एकर जमिनीच्या मालकीची मागणी करणारी याचिका मथुरा न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याचिकेत संपूर्ण जमीन ताब्यात घेण्याची आणि श्रीकृष्णजन्मभूमीच्या बरोबरीने बांधलेली शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग III सोनिका वर्मा यांच्या न्यायालयाने शाही ईदगाहच्या वादग्रस्त जागेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा अहवाल 20 जानेवारीपर्यंत सर्व पक्षांना सादर करावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT