Madhya Pradesh Crime News Dainik Gomantak
देश

पत्नीवर सामूहिक बलात्कार, पती म्हणाला- ती 6 वर्षांपासून आई होऊ शकली नाही, मी काय करु?

Morena Married Woman Gang Rape Case: एका व्यक्तीने आपल्याच पत्नीवर सामूहिक बलात्कार केला.

Manish Jadhav

Morena Married Woman Gang Rape Case: मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्याच पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. त्याने पत्नीला दोन मजुरांच्या स्वाधीन केले आणि सामूहिक बलात्कार करण्यास प्रवृत्त केले. पोलिसांनी आरोपी पतीला असे कृत्य करण्यामागचे कारण विचारले असता, त्याने सांगितले की, ती 6 वर्षापासून आई होऊ शकली नाही. त्याला मूल हवे होते. त्यामुळेच त्याने हे पाऊल उचलले. दरम्यान, ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधात छापे टाकले. परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचीही झडती घेण्यात आली, मात्र त्यांचा सुगावा लागला नाही. यानंतर पोलिसांनी तिघांवर प्रत्येकी 3 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते, मात्र खबरीने दिलेल्या अपडेटवरुन पोलिसांनी घटनेच्या 48 तासांत तिघांना पकडले, त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला.

रस्त्यालगतच्या शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माताबसैया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेडा गावात ही घटना घडली. पीडिता तिच्या आईसोबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली होती. सोलंकी पेट्रोल पंपाजवळील जौरा रोड मुरैना येथील रहिवासी असलेल्या पीडितेच्या आईने सांगितले की, तिच्या मुलीचे 6 वर्षांपूर्वी दिमानी येथील रायपूर गावात राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत लग्न झाले होते, परंतु नवऱ्यामध्ये असणाऱ्या कमतरतेमुळे तिला मूल होत नव्हते.

पीडितेच्या आईने पुढे सांगितले की, तिच्या पतीला मूल हवे होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तिची मुलगी पतीसोबत चान रायपूर पोलीस स्टेशन डिन्नी येथून मुरैना येथे सासरी जात असताना अंधार पडल्यावर पतीने तिला एका शेतात नेले. रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या दोन तरुणांना बोलावून त्यांच्याशी संबंध ठेवण्यास तिला त्याने भाग पाडले, त्याला कोणत्याही किंमतीत मूल हवे होते. याबाबत पीडितेने कोणाला काही सांगितले तर तुला मारुन टाकीन, अशी धमकी पतीने दिली होती.

पोलिसांना सुगावा लागला

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींचा शोध सुरु होता. अज्ञात मजुरांना शोधण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्याचबरोबर आरोपींविरुद्ध बक्षीसही जाहीर केले. सुगावा शोधत असताना, पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले आणि त्यांची ओळख छोंडा गावातील विश्वजीत नाथ यांचा मुलगा संजय नाथ, बस्तापूर शनिचरा गावातील रहिवासी भरभुजा नाथ यांचा मुलगा संजय नाथ अशी झाली. दोघांच्या सांगण्यावरुन महिलेच्या आरोपी पतीलाही पकडण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT