Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia  Twitter / @ ANI
देश

Delhi: मनीष सिसोदियांची सीबीआय चौकशी संपली, तपास यंत्रणेने उपस्थित केले अनेक प्रश्न

Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia: दिल्लीतील प्रसिद्ध अबकारी घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची चौकशी संपली आहे.

दैनिक गोमन्तक

Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia: दिल्लीतील प्रसिद्ध अबकारी घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची चौकशी संपली आहे. मनीष सिसोदिया यांची सीबीआयच्या पथकाने तब्बल 9 तास चौकशी केली. सिसोदिया सीबीआय कार्यालयातून नुकतेच बाहेर पडले आहेत. तपास पथकाने या घोटाळ्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न सिसोदिया यांना विचारले.

याआधी, सोमवारी मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या या चौकशीला आम आदमी पार्टीच्या अनेक नेत्यांनी विरोध केला होता. मनीष सिसोदिया सकाळी 11.15 वाजता दिल्लीतील (Delhi) सीबीआय मुख्यालयात पोहोचले होते. इथे सीबीआयची (CBI) टीम आपल्या प्रश्नांसह त्यांची वाट पाहत होती. सुमारे 9 तासांच्या चौकशीनंतर मनीष सिसोदिया काही वेळापूर्वी सीबीआय कार्यालयातून बाहेर आले.

दरम्यान, या प्रकरणी सीबीआय आता मनीष सिसोदिया यांच्या जबाबांचे विश्लेषण करणार असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. त्यांच्या उत्तरावर सीबीआयचे समाधान झाले नाही, तर त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, असे बोलले जात आहे.

तत्पूर्वी, सीबीआयने रविवारी मनीष सिसोदिया यांना समन्स बजावून त्यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. सिसोदिया यांच्या चौकशीचा निषेध करत आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि कार्यकर्त्यांनी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. मात्र, तिथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संजय सिंह आणि अन्य काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, त्यांनी कलम 144 चे उल्लंघन केले आहे.

सीबीआय चौकशीत सहभागी होण्यापूर्वी सकाळी सिसोदिया म्हणाले होते की, 'मला अटक झाली तर पश्चात्ताप करु नका. देशासाठी बलिदान देण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT