Manish Sisodia Dainik Gomantak
देश

Manish Sisodia: मनीष सिसोदियांचा मोठा दावा, '...म्हणून CBI अधिकाऱ्याने आत्महत्या केली'

Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सीबीआय अधिकाऱ्याच्या मृत्यूचा आपल्या प्रकरणाशी संबंध जोडत मोठा दावा केला आहे.

दैनिक गोमन्तक

Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सीबीआय अधिकाऱ्याच्या मृत्यूचा आपल्या प्रकरणाशी संबंध जोडत मोठा दावा केला आहे. मनीष सिसोदिया यांनी सोमवारी सांगितले की, 'आपल्या अटकेसाठी परवानगी देण्याच्या दबावाखाली सीबीआयचे कायदेशीर सल्लागार जितेंद्र कुमार यांनी आत्महत्या केली.' यादरम्यान, सिसोदिया यांनी भाजपने केलेले 'स्टिंग ऑपरेशन' हा विनोद असल्याचे म्हटले. सीबीआयला आपल्याविरुध्द काहीही सापडले नसल्याचेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, दारु घोटाळ्याबाबत भाजपकडून (BJP) सुरु असलेल्या स्टिंगला उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. सिसोदिया पुढे म्हणाले की, 'हे स्टिंग नसून एक विनोद आहे, भाजपने दारु घोटाळ्यावर खूप गाजावाजा केला, कधी 8 हजार कोटी, कधी 11000 कोटी, दीड लाख केले तरी ते स्वत: ठरवू शकले नाहीत.'

सिसोदिया पुढे असेही म्हणाले, "सीबीआयला माझ्या घरात, माझ्या बँक लॉकरमध्ये काहीही सापडले नाही. माझ्यावर दोन कंपनीचे व्यवहार जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु सीबीआयच्या तपासात मला जवळपास क्लीन चिट मिळाली आहे. त्यामुळे आता कोणाला प्रश्नोत्तरे करुन स्टिंग करायला सांगितले जात आहे, ते मला कळत नाही. अशा प्रकारे माझ्याजवळही स्टिंग आहे, मी ही चालवू शकतो. पण भाजपचा डंका हा विनोद नाही.''

दबावाखाली सीबीआय अधिकाऱ्याने आत्महत्या केली: सिसोदिया

मनीष सिसोदिया म्हणाले, ''दोन दिवसांपूर्वी एका सीबीआय अधिकाऱ्याने आत्महत्या केली. जितेंद्र कुमार हे सीबीआयच्या (CBI) लाचलुचपत प्रतिबंधक शाखेत उपविधिमंडळ सल्लागार होते, अशी माहिती आहे. कायदेशीर गोष्टी पाहणे हे त्यांचे काम होते. एक्साईज प्रकरणात माझ्यावर जी खोटी एफआयआर दाखल करण्यात आली होती, त्याची कायदेशीर बाजू ते पाहत होते. माझ्यावर चुकीचा गुन्हा दाखल करुन मला अटक करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. मात्र त्यास ते मान्यता देत नव्हते. त्यांच्यावर इतका दबाव होता की, त्यांना आत्महत्या करावी लागली. हे संपूर्ण प्रकरण खोटे असल्याचे पाहणाऱ्या एका सीबीआय अधिकाऱ्यावर एवढा दबाव टाकण्यात आला की, त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले, हे अत्यंत दुःखद आहे. हे अत्यंत खेदजनक आहे.”

पंतप्रधान मोदींना तीन प्रश्न विचारले

मनीष सिसोदिया यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना तीन प्रश्न विचारत म्हणाले, “तुम्हाला हवे असल्यास मला अटक करा, पण तुमच्या अधिकाऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करु नका. मला पंतप्रधानांना विचारायचे आहे की, अधिकाऱ्यांवर इतका दबाव का टाकला जात आहे, की ते असे पाऊल उचलतात. राज्यपाल आणि लेफ्टनंट गव्हर्नर, सीबीआय, ईडी यांच्यावर दबाव आणून उलटे काम केले जात आहे, त्याचप्रमाणे ‘ऑपरेशन लोटस’ चालवणे हे केंद्राकडे फक्त काम उरले आहे का? हे पंतप्रधान मोदींनी सांगावे. तिसरा प्रश्न म्हणजे, जनतेने निवडून दिलेल्या सरकारला उलथवून टाकण्यासाठी आणखी किती बलिदान द्यावे लागणार?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

SCROLL FOR NEXT