Manipur Violence Dainik Gomantak
देश

Manipur Violence Update: मणिपूरचे कसे होणार? आधी, मंत्र्यांचे घर आणि गोदाम पेटवले, आता हजारो महिलांनी सुरक्षा दलाला घेरले

Army In Manipur: मणिपूरमध्ये हजारो महिलांनी सुरक्षा दलाला घेराव घातला त्यामुळे सैन्याला माघार घ्यावी लागली, जाणून घ्या कशी आहे परिस्थिती.

Ashutosh Masgaunde

12 KYKL Militants Released:

मणिपूरमध्ये अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. मणिपूरमध्ये निमलष्करी दलांसोबत लष्कराचे जवानही तैनात आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने सैन्य तैनात करूनही हिंसाचार थांबत नाही की शांतता प्रस्थापित होत नाही.

आता अशी बातमी समोर आली आहे की हजारो महिलांनी एका भागात सुरक्षा दलांना घेरले आहे. अशा प्रकारे घेरल्यानंतर सुरक्षा दलांना त्यांची शोध मोहीम थांबवावी लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, KYKL च्या काही कार्यकर्त्यांना सुरक्षा दलांनी पकडले होते पण महिलांनी त्या कार्यकर्त्यांना घेरले आणि त्यांची सुटका केली.

काही दिवसांपूर्वी दंगलखोरांनी एका केंद्रिय राज्य मंत्र्याचे घर पेटवले होते. तर नुकतेच मणिपूरच्या विद्यमान मंत्र्याच्या गोदामालाही आग लावली होती.

संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, सुरक्षा दलांच्या विशेष गुप्तचर माहितीच्या आधारे पूर्व इंफाळ जिल्ह्यातील इथम गावात 24 जून रोजी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत KYKL च्या 12 कार्यकर्त्यांकडून शस्त्रे, दारूगोळा आणि युद्धात वापरल्या जाणार्‍या इतर अनेक गोष्टी जप्त करण्यात आल्या.

यामध्ये स्वयंभू लेफ्टनंट कर्नल मोइरंगथम तांबा उर्फ ​​उत्तम याची ओळख पटली. ही व्यक्ती 2015 मध्ये डोग्राच्या 6 व्या बटालियनवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड होती.

अधिकृत निवेदनात असे सांगण्यात आले की या भागात सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू होते. महिला आणि स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली 1200 ते 1500 लोकांच्या जमावाने परिसराला वेढा घातला आणि सुरक्षा दलांना त्यांचे ऑपरेशन सुरू ठेवण्यापासून रोखले.

सुरक्षा दलांनी वारंवार आवाहन केले पण ते मान्य झाले नाहीत. या प्रकरणाची संवेदनशीलता आणि अशा परिस्थितीत कारवाईमुळे रक्तपात होण्याची भीती लक्षात घेऊन या 12 स्थानिक कार्यकर्त्यांनी लोकांच्या ताब्यात देण्याचा निर्णय उपस्थित अधिकाऱ्यांनी घेतला.

या सर्व प्रकारानंतर सुरक्षा दलांनी तो परिसर सोडला. तसेच जप्त केलेली शस्त्रास्त्रे आणि युद्धासारखी रचनाही तिथेच टाकून दिली होती. भारतीय लष्कराने मणिपूरच्या लोकांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.

काही ठिकाणी संचारबंदी शिथिल

मणिपूरमध्ये या सर्व घडामोडी घडत असताना खोऱ्यातील काही जिल्ह्यात 12 ते 15 तासांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. तर तेंगनौपल, चुराचंदपूर आणि कांगपोकपी जिल्ह्यात 8 ते 10 तासांसाठी शिथिल करण्यात आली होती.

उर्वरित सहा जिल्ह्य़ांमध्ये, ज्यात बहुतांश नागांचे प्राबल्य आहे, तेथे कर्फ्यू नाही. मणिपूर सरकारनेही लोकांना राज्यातील सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT