Supreme Court  Dainik Gomantak
देश

Manipur Violence: ''170 मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत'', SC ने व्यक्त केली चिंता

Manipur Violence: मणिपूर हिंसाचारात आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Manish Jadhav

Manipur Violence: मणिपूर हिंसाचारात आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अनेकांच्या मृतदेहांवर अद्यापही अंतिम संस्कारही झालेले नाहीत. मणिपूर हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या 170 मृतदेहांवर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.

चिंता व्यक्त करताना न्यायालयाने सांगितले की, राज्यातील परिस्थिती लक्षात घेता मृतदेह शवागारात पडून राहणे योग्य नाही. या माध्यमातून एकप्रकारे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आपल्या आदेशात म्हटले आहे की, ''ज्या मृतदेहांची ओळख पटली आहे आणि त्यांच्या नातेवाईकांनी दावा केला आहे, त्यांच्या कुटुंबीयांकडून सरकारने ठरवलेल्या 9 ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाऊ शकते. यामध्ये कोणत्याही तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाची गरज नाही. येत्या सोमवारपर्यंत हे अंत्यसंस्कार पूर्ण करावे. सरकार कुटुंबीयांना अंत्यसंस्काराच्या 9 ठिकाणांची माहिती देणार आहे.''

एससीने सांगितले की, ''सोमवारपर्यंत ज्या मृतदेहांची ओळख पटली आहे त्यांच्या कुटुंबीयांना सरकार पुन्हा माहिती देईल. नातेवाईकांनी आठवडाभरात मृतदेह ताब्यात घेतला नाही तर सरकार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करु शकते. ज्या मृतदेहांची ओळख पटली नाही अशा मृतदेहांवर सरकार (Government) अंत्यसंस्कार करु शकते.

मात्र, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी डीएनए नमुने घेणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी आणि एसपी यांनी मृतदेहांवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले जातील याची खात्री करावी.

त्याचबरोबर, कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये. मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांना मृतदेहांची ओळख पटवून त्यांचे अंत्यसंस्कार करता येतील याची सरकार खात्री करेल.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coal Protest: 'कोळशाला विरोध करण्यासाठी गोव्यातील जनतेने सहभागी व्हावे'! सरदेसाईंचे आवाहन; जागृती सभेचे आयोजन

तुफान वादळ, खवळलेला अरबी सागर; 11 दिवस जीवाचा संघर्ष केल्यानंतर 31 मच्छिमारांची घरवापसी

Verca Parasailing Accident: पॅराशूट भरकटले आणि अडकले माडात! ‘त्या’ व्यावसायिकाचा परवाना रद्द; पर्यटन खात्‍याची कारवाई

Oceanman Controversy: मच्छीमारांनी काय करावे? 'ओशनमॅन'वरुन विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल; प्रशासन पूर्णपणे खालावल्याचे आरोप

EV Bus Strike: पणजीच्या प्रवाशांना 'स्मार्ट शॉक', 48 इलेक्ट्रिक बसेस अचानक गायब; वेतन थकल्यामुळे बस चालकांचा संप

SCROLL FOR NEXT