Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: ''तू तुझी बुद्धी गहाण ठेवलीस का?'', मंदिराबाहेर बायकोच्या पाया पडणाऱ्या नवऱ्याची आजीबाईनं काढली खरडपठ्ठी, यूजर म्हणाले...

Funny Temple Video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडिओ जे चर्चेचे विषय बनतात तर काही वादाचे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Manish Jadhav

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडिओ जे चर्चेचे विषय बनतात तर काही वादाचे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती मंदिराबाहेर आपल्या पत्नीच्या पायाला स्पर्श करुन आशिर्वाद घेताना दिसत आहे. मात्र जवळच उभी असलेली आजी त्याला अशाप्रकारे फटकारते की ऐकणाऱ्यांनाही हसू आवरत नाही.

आधी हा व्हिडिओ पाहा

आजीने 'त्याला' फटकारले

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की, एक व्यक्ती मंदिराबाहेर (Temple) आपल्या पत्नीच्या पायाला स्पर्श करत आहे. आता याला भक्ती म्हणा की पत्नीला खूश करण्याचा प्रयत्न. काहीही समजत नाही. पती जेव्हा पत्नीच्या पायाला स्पर्श करतो तेव्हा ती काहीशी लाजते. त्यानंतर दोघेही काही क्षणासाठी रोमँटिक होतात. त्याचवेळी, जवळच उभी असलेली एक आजी हे दृश्य पाहून चिडते. ती म्हणते, "तू तुझी बुद्धी गहाण ठेवली का?" तिच्या या बोलण्यावर ते दोघेही हसतात. त्यानंतर तो व्यक्ती म्हणतो, आपल्याकडे महिलांचे पाय स्पर्श करण्याची परंपरा आहे. यावर, आजी पुन्हा एखदा त्याला फटकारत म्हणते, इतर महिला देखील तुझी आई आणि बहीण आहेत, जा आणि त्यांच्या पाय पड. आजीचे हे ऐकून तिथे उपस्थित असलेले लोकही हसायला लागतात. तर अनेकांनी आजीच्या या प्रतिक्रियेचा व्हिडिओ त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला. जो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

आजीची खरडपट्टी ऐकून लोकांना हसू आवरेना!

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम आणि एक्स वरील अनेक अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. एकाने लिहिले की, "आजीने एका मिनिटात पती-पत्नीच्या रोमान्सवर पाणी फेरले!" दुसऱ्याने लिहिले की, "ही आजी माझ्या आजीची कॉपी आहे, ती प्रत्येक गोष्टीत फुकट व्यत्यय आणते." तर तिसऱ्याने लिहिले की, "बिचारा... आपल्या पत्नीला इम्प्रेस करु इच्छित होता, पण आजीने सगळी माती केली!" दुसरीकडे, काही लोक कमेंट सेक्शनमध्ये आजीच्या बिंदास शैलीचे चाहते बनले. एकाने लिहिले की, "आजीने स्टँड-अप कॉमेडीमध्ये जावे, परफेक्ट टाइमिंग!" त्याचवेळी, काही लोक त्या व्यक्तीच्या समर्थनार्थ आले आणि म्हणाले, "अरे, पत्नीच्या पायांना स्पर्श करण्यात काय चूक आहे? आजीने विनाकारण तमाशा केला."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

Jitesh Sharma: लॉर्ड्समध्ये जितेश शर्माची 'फजिती'! 'या' खेळाडूमुळे मिळाली एन्ट्री, पाहा VIDEO!

Comunidade Land Goa: कोमुनिदादींच्या जमिनी केवळ गावकार व भागधारकांच्याच; हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही

Viral Video: जगाला वेड लावणारा 'ऑरा फार्मर'! 11 वर्षांचं पोर बनलं सोशल मीडियावर स्टार; त्याचा अनोखा डान्स तुम्ही पाहिला का?

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

SCROLL FOR NEXT