Rajasthan Crime News 
देश

पैसे संपले म्हणून उधार घेण्यासाठी गोव्यातून परत आला; विद्यार्थिनीवर बलात्कारचा प्रयत्न करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Rajasthan Crime News: पोलिसांपासून वाचण्यासाठी तो बेंगळुरू, मुंबई, अहमदाबाद आणि सुरत येथून आपले ठिकाण बदलत राहिला. पोलिसांनी त्याचा २५०० किमी पाठलाग केला.

Pramod Yadav

राजस्थान: फतेहपुरा येथील शाळेत १३ वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपातील संशयित जिम ट्रेनर प्रदीप सिंग याला अखेर आठव्या दिवशी अटक करण्यात आली. फरार असलेला ट्रेनर महाराष्ट्र, गुजरात, गोव्यात लपला होता. खर्चासाठी पैसे संपल्यानंतर उधारीवर पैसे घेण्यासाठी मंगळवारी परत आला असता पोलिसांनी त्याला अटक केली.

पोलिसांनी एका स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, देवळीतील नीमज खेडा येथील रहिवासी असलेला आरोपी प्रदीप २६ ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेपासून फरार होता. तो गुजरात, महाराष्ट्र मार्गे गोव्यात पळून गेला होता. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो बेंगळुरू, मुंबई, अहमदाबाद आणि सुरत येथून आपले ठिकाण बदलत राहिला. पोलिसांनी त्याचा २५०० किमी पाठलाग केला. दरम्यान, त्याचे बँक खाते गोठवले गेले. त्याचे पैसे संपले तेव्हा तो मंगळवारी पैसे उधार घेण्यासाठी उदयपूरला आला होता.

दुपारी तो कोर्ट चौकात ओळखीच्या व्यक्तीची वाट पाहत होता तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली. गुन्ह्याच्या ठिकाणाची पडताळणी करण्यासाठी त्याला शाळेत नेण्यात आले असता त्यांने पळून जाण्याचा प्रयत्न केला. आयद नदीत उडी मारून पळून जाताना, खड्ड्यात पडल्याने त्याच्या पायाला जखम झाली. पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली आणि एमबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत तसेच पोलिस कोठडीतून पळून जाण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपी प्रदीपचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये तो गुडघ्यावर बसून मोठ्याने रडत आणि माफी मागताना दिसत आहे. २०१८ मध्ये त्याच्याविरुद्ध अंबामाता पोलिस ठाण्यात दरोडा, शस्त्रास्त्र कायदा आणि चोरीचे नियोजन केल्याबद्दल हिरणमग्री पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणांमध्ये तो आधीच ३ महिने तुरुंगात गेला आहे. पोलिस आरोपीची चौकशी करत आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

संशयित प्रदीपने क्रीडा प्रशिक्षणाच्या बहाण्याने सुट्टीच्या दिवशी पीडित मुलीला शाळेत बोलावले होते. २६ ऑगस्ट रोजी याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. दाखल तक्रारीनुसार, १३ वर्षांची मुलगी शाळेत वेटलिफ्टिंगचा सराव करते. प्रशिक्षक प्रदीप सिंगने २५ ऑगस्ट रोजी मुलीला फोन करून सरावासाठी येण्यास सांगितले. मुलगी शाळेत पोहोचली तेव्हा प्रदीप शाळेत एकटाच होता.

संशयिताने पीडित मुलीला राष्ट्रीय स्तरावर खेळू न देण्याची तसेच, वडिलांना अटक करण्याची धमकी देऊन तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मुलगी संध्याकाळी घरी आली आणि तिने घरात घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पालकांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान, शाळा प्रशासनाने संशयित संस्थेचा कर्मचारी नसल्याचे म्हटले आहे. शाळेतील मुलांना मोफत प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव त्याने ठेवला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT