Online Shopping
Online Shopping Dainik Gomantak
देश

Online Shopping: मागवला लॅपटॉप, मिळाले वेगळेच काही!

गोमन्तक डिजिटल टीम

Online Shopping: वडीलांना भेट देण्यासाठी एका व्यक्तीने मोठ्या हौसेने ऑनलाईन खरेदी (E Commerce) संकेतस्थळावरून लॅपटॉप मागवला, पण त्याला लॅपटॉप (Laptop) तर मिळालाच नाही, उलट जी वस्तु त्याच्या घरी पोचली ती पाहून त्याला हसावे की रडावे कळेना. फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डे सेलमध्ये हा प्रकार घडला आहे.

सण-उत्सव काळात ऑनलाईन खरेदी-विक्री संकेतस्थळांच्या विविध सेलमधून लोक वस्तू खरेदी करत असतात. या सेलमध्ये लोकांनी खरेदी करावे, म्हणून ई-कॉमर्स जायंट कंपन्या विविध उत्पादने, वस्तुंच्या विस्तृत श्रेणींवर विविध सवलती जाहीर करत असतात. अहमदाबादच्या 'आयआयएम'मध्ये शिकत असलेल्या यशस्वी शर्मा याने फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डे सेलमधून (Flipkart Big Billion Day Sale) वडिलांसाठी लॅपटॉप मागवला होता.

पण त्याला त्या बदल्यात चक्क कपडे धुण्याच्या साबणाच्या वड्या (Soap Bars) मिळाल्या आहेत. य़शस्वी याने त्याच्या लिंकेड इन (Linked in) अकाऊंटवरून याबाबत त्याच्या तक्रारीचा (grievances) पाढा वाचला आहे.

यशस्वीने लिहिले आहे की, डिलिव्हरी बॉय (Delevery Boy) जेव्हा बॉक्स घेऊन घरी आला. य़शस्वीच्या वडीलांना लॅपटॉपबाबत तसेच फ्लिपकार्टच्या ओपन बॉक्स डिलिव्हरी या संकल्पनेबाबत काहीही कल्पना नव्हती. ओपन बॉक्स डिलिव्हरीमध्ये ग्राहक आपण मागवलेल्या वस्तुचे पार्सल डिलिव्हरी बॉयच्या उपस्थितीत उघडतो.

ग्राहकाची फसवणूक होऊ नये, त्यांनी मागवलेली वस्तूच त्यांना मिळावी, हा या मागचा उद्देश आहे. वस्तु उघडून पाहिल्यानंतर डिलीव्हरी बॉयला ओटीपी द्यावा लागतो. डिलिव्हरी बॉयने बॉक्सची तपासणी केली नाही. डिलीव्हरी बॉय आल्याचे सीसीटीव्ही फुटेजही आहे. डिलिव्हरी बॉयने माझ्या वडिलांना ओटीपी घेण्याआधी ओपन बॉक्स संकल्पेनेबाबत सांगायला हवे होते. मध्यमवर्गीय भारतीयांसाठी लॅपटॉप ही महागडी वस्तू आहे. त्यामुळे यात माझे नुकसान आहे. ग्राहक तक्रार मंचाकडे जाण्यापुर्वी ही पोस्ट हा माझा अखेरचा प्रयत्न आहे.

वस्तु परत घेणार नाही: फ्लिपकार्ट

फ्लिपकार्टच्या वरिष्ठ ग्राहक संपर्क अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकाराबाबत मात्र हात वर केले आहेत. आता पुन्हा दिलेली वस्तु परत घेणे शक्य नाही. (No Return) तुमच्या वडिलांनी डिलिव्हरी बॉयला लॅपटॉप आहे की नाही हे न पाहताच ओटीपी द्यायला नको होता. आम्ही याबाबत काही करू शकत नाही, असे स्पष्टीकरण फ्लिपकार्टच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT