DTC Bus  DTC
देश

New Delhi: धक्कादायक! बसमध्ये मुलीसमोरच केले हस्तमैथुन, दिल्लीतील घटना

याबाबत एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

New Delhi News: देशाची राजधानी दिल्ली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बसमधून जात असताना एका व्यक्तीने मुलीसमोरच हस्तमैथुन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिल्लीतील रोहिणी भागात ही घटना घडली. याबाबत एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे आरोपीला देखील अटक करण्यात आलेली नाही. अशी माहिती समोर आली आहे.

(Man Masturbates Next To Girl On Delhi Bus)

व्हायरल व्हिडिओनुसार, डीटीसी बसमध्ये मुलीसमोरच एका व्यक्तीने हस्तमैथुन केले. मुलीने अलार्म वाजवल्यानंतर बसमधील मार्शलने त्या व्यक्तीला पकडले. पकडल्यानंतर हा व्यक्ती चक्क रडायला लागला. असे या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.

बिहारमधील रहिवासी असलेल्या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, परंतु अद्याप कोणतीही तक्रार दाखल न झाल्याने त्याला अटक करण्यात आली नाही, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

बुधवारी घटनेची माहिती मिळाल्यानंतर उत्तर रोहिणी पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक सुमन यांच्या नेतृत्वाखाली या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. पीडितेला तिचे म्हणणे नोंदवण्यासाठी किंवा या संदर्भात तक्रार देण्यासाठी संपर्क साधण्यात आला परंतु तिने नकार दिला, असे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nanoda: सफर गोव्याची! मंदिरातल्या नादमधूर सुस्वरांनी भक्तीमय होणारे, सर्वांना भुरळ घालणारे टुमदार 'नानोडा'

High Court: बलात्काराचा आरोप सिद्ध करण्यासाठी 'पेनेट्रेशन' अनिवार्य..! 20 वर्षांनंतर आरोपीला हायकोर्टाचा मोठा दिलासा

Shiv Jayanti Wishes In Marathi: जय भवानी, जय शिवाजी! शिवजयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठी शुभेच्छा!

8th Pay Commission: लवकरच लागू होणार 8वा वेतन आयोग! कोणाची होणार चांदी अन् कोणाला बसणार फटका? जाणून घ्या सविस्तर

Seema Haider: नव्या घरात हलला पाळणा, पाकिस्‍तानहून भारतात आलेल्‍या सीमा हैदरनं दिला गोंडस मुलाला जन्म; पुन्हा बनली 'आई'

SCROLL FOR NEXT