Man  Dainik Gomantak
देश

Viral Video: वाढत्या लोकसंख्येवर बहाद्दराचं गमतशीर उत्तर, 'आता सात मुलं हाईत...'

Viral Video: भारतातील वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजना सुरु केल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Viral Video: भारतातील वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजना सुरु केल्या आहेत. नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण होण्यासाठी 'हम दो, हमारे दो' चा नाराही देण्यात आला. सरकार आणि जागरुक नागरिकांच्या प्रयत्नांमुळे लोकसंख्या वाढीच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. मात्र, असे असतानाही भारत लवकरच चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार आहे. अशा स्थितीत लोकसंख्येवर नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी त्यांना प्रश्न विचारण्यात आले. पण आज तुम्हाला त्यात मिळणारी उत्तरे ऐकून नक्कीच धक्का बसेल.

एका व्यक्तीला प्रश्न विचारण्यात आला

वृत्तनिवेदकाने एका दुचाकीस्वाराला थांबवून वाढत्या लोकसंख्येबाबत प्रश्न विचारल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पत्रकाराने (Journalist) विचारले की, भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, मात्र लोकसंख्या कमी झाली पाहिजे असे लोक मानतात. पण त्या व्यक्तीने दिलेल्या उत्तराची कल्पना क्वचितच कोणी करु शकेल. त्या व्यक्तीने सांगितले की, एका व्यक्तीला कमीत-कमी 12 मुले असावीत,असे माझे मत आहे. गंमत म्हणजे बाईकवर बसलेल्या पत्नीच्या सांगण्यावरुन त्या व्यक्तीने पुढे सांगितले की, मला स्वतःला सात मुले आहेत.

दुसरीकडे, तो व्यक्ती पुन्हा पुन्हा सांगतो की, आणखी पाच मुलांना जन्म द्यायचा आहे. एका मुलाने काळजी घेतली नाही तर तो दुसऱ्याकडे जाता येईल, असे तो त्याच्या मुद्द्याचे समर्थन करताना म्हणतो. यानंतर जेव्हा त्या व्यक्तीच्या पत्नीला एवढी मुले (Childrens) असण्याबाबत विचारण्यात आला असता तीही लगेचच आपल्या पतीला पाठिंबा देताना दिसली.

यामध्ये पत्नीचे म्हणणे आहे की, तिला आधीच सात मुले आहेत. पती-पत्नीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो bhutni_ke_memes या हँडलने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत. अशाच एका यूजरने लिहिले की, आपला देश अशा लोकांनी भरलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

High Court: 'गाय केवळ पूजनीय नाही तर...', गोवंश तस्कराला हायकोर्टाचा झटका; नोंदवले महत्त्वपूर्ण निरीक्षण

Rohit Sharma Record: फक्त एक सामना आणि हिटमॅन 'रोहित' रचणार मोठा विक्रम; सामील होणार खास क्लबमध्ये

Ganesh Festival 2025: परंपरा, कला आणि पर्यावरणाचा संगम... सुबक गणेशमूर्ती साकारणारे 'च्यारी घराणे'; दक्षिण गोव्यात प्रसिद्ध

Team India Title Sponsor: टीम इंडियाच्या जर्सीवरून उतरलं 'ड्रीम', आता कोण होणार नवा प्रायोजक? 'या' मोठ्या कंपनीचं नाव चर्चेत

UP Crime: आंतरराज्य सायबर टोळीचा पर्दाफाश! गोव्यातून चालवले जात होते ऑनलाइन बेटिंग, तिघांना अटक

SCROLL FOR NEXT