Mamata Banerjee Dainik Gomantak
देश

Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात; डोक्याला दुखापत

Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या बर्दवानमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

Manish Jadhav

Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या बर्दवानमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. ही दुखापत गंभीर नसल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ममता यांच्या ताफ्यात अचानक एक कार घुसली. ताफ्यात गाडी अचानक घुसल्याने कार चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला मार लागला. ही दुखापत किरकोळ असल्याचे सांगण्यात येत आहे.

दाट धुक्यामुळे हा अपघात झाला

यापूर्वी, ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरने कोलकाता येथे परतणार होत्या, परंतु दाट धुके आणि कमी दृश्यमानता यामुळे त्यांनी रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला असल्याचेही वृत्त आहे. दाट धुक्यामुळे ममता बॅनर्जींच्या गाडीला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर ममता बॅनर्जी यांना एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या दुखापतीबाबत अद्याप कोणीही माहिती दिलेली नाही.

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी ममता वर्धमानला गेल्या होत्या

ममता बॅनर्जी वर्धमान जिल्ह्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी गेल्या होत्या. तेथून परतत असताना हा अपघात झाला. याआधीही जून 2023 मध्ये ममता बॅनर्जी प्रवासादरम्यान जखमी झाल्या होत्या. त्यावेळी, ममता यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco: 'हे डबल इंजीन नसून डबल धोका सरकार'! LOP युरींचा घणाघात; वास्को ‘घोस्ट टाऊन’ बनवण्याचा डाव असल्याचा आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; सर, खरेच आपल्याला मंत्रिपद नको होते का?

Goa Crime: गोव्यात 10 लाखांच्या दागिन्यांची चोरी, महाराष्ट्रात अनेक घरफोड्या; CCTV मुळे अट्टल चोरटा अटकेत

Goa Fisheries Policy: 6 महिन्‍यांत आखणार राज्य मत्स्योद्योग धोरण! मच्छीमार गावे अधिसूचित होणार; सरकारी पातळीवर हालचाली सुरू

RO RO Ferry: ..आता मुंबईतून सिंधुदुर्गात पोचणार झटक्यात! रो - रो सेवेची चाचणी; बोटीचे विजयदुर्ग बंदरात आगमन

SCROLL FOR NEXT