Mamata Banerjee criticized Modi's photo also on the death certificate Dainik Gomantak
देश

मृत्यू प्रमाणपत्रावर सुद्धा 'मोदींचा फोटो' लावा: ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी यावेळी असे सांगितले की, पश्चिम बंगालला केंद्र सरकारकडून पुरेशा लसी मिळत नाही.

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री (Chief Minister) आणि तृणमुल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकरावर जोरगदार टीका केली आहे. कोरोना व्हक्सीनेशन प्रमाणपत्रावर तर तुम्ही तुमचा फोटो लावलाच आहे आता मृत्यूपत्रावर सुद्धा लावा असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

ममता बॅनर्जी यांनी यावेळी असे सांगितले की, पश्चिम बंगालला केंद्र सरकारकडून पुरेशा लसी मिळत नाही. ग्रामीण भागात जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण होई पर्यंत राज्य सरकारला सर्व सामान्यांसाठी आवश्यक असलेली लोकल ट्रेन सुरु करता येत नाहीयेत.

पश्चिम बंगाल सरकारने नुकतेच नवे नियम लागु केले आहेत. यापूर्वी, रात्रीच्या कर्फ्यूचे तास रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत होते. गुरुवारी, पश्चिम बंगाल सरकारने राज्यात कोविड -19 मुळे लागु करण्यात आलेला लॉकडाऊन 30 ऑगस्टपर्यंत वाढवला आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी साथीच्या कारणास्तव मानवतावादी दृष्टीकोनातुन जन्मठेपेची शिक्षा झालेल्या 55 वर्षांवरील 73 दोषींना तुरुंगातून मुक्त करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी कोविड -19 मुळे राज्यात 63 दोषींची अकाली सुटका झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bank Fraud: गोव्यात हातचलाखी करून खातेदारांना लाखोंची टोपी! महिला बँक कर्मचाऱ्यास अटक; पोलिस निरीक्षकाची तपासात हलगर्जी

Zuarinagar Raid: कंपन्यांचे कर्मचारी असल्याचे भासवून अमेरिकन नागरिकांना कोट्यवधींचा गंडा; झुआरीनगरातील कॉल सेंटरचा पर्दाफाश

UN Report: महिलांसाठी घरचं बनले सर्वात धोकादायक ठिकाण; संयुक्त राष्ट्रांच्या रिपोर्टमधून मोठा खुलासा!

Goa Eco Sensitive Zone: गावे वगळण्‍यासाठी मुख्‍यमंत्र्यांची धडपड! केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांची घेतली भेट; पाहणी दौऱ्यासाठी पथक दाखल

Goa Politics: मुख्यमंत्री, तानावडे व सभापती दिल्लीत, चर्चांना उधाण; मंत्रिमंडळ फेरबदलाचा मात्र इन्कार

SCROLL FOR NEXT