Bhopal Madhya Pradesh Crime Dainik Gomantak
देश

डॉक्टरच्या घरातून मोलकरणीने एक-एक दागिना केला चोरी, व्हॉट्सॲप DP मुळे उघड झाला प्रकार

महिन्याला आठ हजार रुपये पगारावर काम करणाऱ्या महिलेच्या घरात एसीपासून सर्व सुविधा असल्याचे पाहून पोलिसांना धक्का बसला.

गोमन्तक डिजिटल टीम

Bhopal Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका फोटोमुळे 50 लाखांचे दागिने आणि 5 लाख रुपयांची चोरी उघडकीस आली आहे. पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली महिलेला अटक केली आहे. महिन्याला आठ हजार रुपये पगारावर काम करणाऱ्या महिलेच्या घरात एसीपासून सर्व सुविधा असल्याचे पाहून पोलिसांना धक्का बसला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

टीटी नगर पोलिस स्टेशन परिसरातील निशांत कॉलनीत राहणारे डॉ. भूपेंद्र श्रीवास्तव यांनी घरातून मौल्यवान दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. शहाजहानाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत भूपेंद्र यांचे खासगी रुग्णालय आहे.

गेल्या काही वर्षांत त्यांच्या घरातून हळूहळू मौल्यवान दागिने आणि रक्कम चोरीला जात होती. चोरीच्या संशयावरून आम्ही 20 दिवसांपूर्वी मोलकरणीला नोकरीवरून काढून टाकले. त्यांच्या पत्नीकडे मोलकरणीचा व्हॉट्सॲप नंबर आहे.

बायकोने मोलकरणीच्या डीपीचा फोटो पाहिला तेव्हा मोलकरणीच्या कानात दागिने दिसले. संशय आल्याने तिने लॉकर उघडून पाहिले. पण, त्यात ठेवलेले कानातले गायब होते. मोलकरणीने घरातील दागिने चोरले असावेत, असा संशय आला.

डॉक्टरांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मोलकरणीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली, चौकशीनंतर तिने डॉक्टरांच्या घरात चोरी केल्याचे मान्य केले. पोलिसांनी आरोपी महिलेकडून बांगड्या, टॉप्स, नेकलेस, जडाऊ सेट आणि सोन्याच्या बांगड्यांसह 50 लाख रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. यासोबतच साडेपाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

डॉ. भूपेंद्र कुटुंबासह घराबाहेर असताना ती घरात चोरी करायची. शिवाय एखाद्या फंक्शनला जायचे असेल तर ती तिच्या मालकिनचे दागिने घालायची.

आरोपी महिलेला डॉक्टरांच्या घरी काम करण्यासाठी 8 हजार रुपये पगार मिळत होता. तर त्यांचे पती कंत्राटी पद्धतीने काम करतात. अशा परिस्थितीत घराचे उत्पन्न सुमारे 15-20 हजार रुपये असावे. मात्र, तिच्या दुमजली घरात एसी बसवलेला आहे आणि सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले आहेत, लाईव्ह टी.व्हीची सुविधा आहे. येथे मोलकरीण पती आणि दोन मुलांसह राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT