Datta Padsalgikar To Oversee Manipur Violence CBI Investigation Dainik Gomantak
देश

Manipur Violence: महाराष्ट्राचे माजी डीजीपी ठेवणार सीबीआय तपासावर देखरेख

Supreme Court: मेतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या आदेशाच्या निषेधार्थ ही रॅली काढण्यात आली. यानंतर जातीय हिंसाचारात 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे,

Ashutosh Masgaunde

Maharashtra's Former DGP Datta Padsalgikar To Oversee Manipur Violence CBI Investigation:

मणिपूर हिंसाचाराशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सोमवारी सुनावणी झाली. हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये मदत, पुनर्वसन इत्यादी मानवतावादी समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तीन न्यायाधीशांची समिती स्थापन करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायमूर्ती गीता मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली या समितीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती शालिनी जोशी आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती आशा मेनन यांचा समावेश आहे.

यासोबतच सीबीआयच्या तपासावर देखरेख ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका माजी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात केली आहे.

मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी आदेश दिले की CBI तपास महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांच्या देखरेखीखाली असेल.

सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे की तपासाचे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. परंतु कायद्याच्या नियमावर विश्वास ठेवण्यासाठी, सीबीआयद्वारे विविध राज्यांमधून डेप्युटी एसपी दर्जाचे किमान पाच अधिकारी नियुक्त केले जातील असे निर्देश देण्याचा प्रस्ताव आहे.

मणिपूरमध्ये मे महिन्यापासून हिंसाचार

३ मे रोजी मणिपूरमध्ये आदिवासींच्या रॅलीनंतर हिंसाचार उसळला. मणिपूरमधील मेतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या न्यायालयाच्या आदेशाच्या निषेधार्थ ही रॅली काढण्यात आली.

यानंतर जातीय हिंसाचारात 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. 50 हजारांहून अधिक लोकांना घरे सोडून आश्रयस्थानांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Bust: थिवी रेल्वे स्थानकावर 3.5 लाखांचा अंमली पदार्थ जप्त, 25 वर्षीय नेपाळी नागरिकाला अटक; कोलवाळ पोलिसांची कारवाई

...त्यांनी मला रडवलं, ओझं घेऊन भर पावसात 5KM चालले; दक्षिण गोव्यात टॅक्सी माफियांची गुंडागर्दी, गुजराती महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव Video

Akasa Air चा सावळा गोंधळ, पुण्यात सुरक्षा तपासणी विलंबामुळे सहाजण गोव्यातील शूटिंग चॅम्पियनशिपला मुकले

Goa Live Updates: मुंगुल हल्ल्याप्रकरणी एका आरोपीला सशर्त जामीन मंजूर!

Goa Tourism: 'गोव्याची बदनामी थांबवूया'! रस्ते, भटकी जनावरे, भिकारी प्रश्नांवर चर्चा; नागवा-हडफडेत पर्यटन हंगामाबाबत बैठक

SCROLL FOR NEXT