Madras High Court Dainik Gomantak
देश

Madras High Court: पत्नीच्या त्यागाची काही किंमत आहे की नाही? कायद्यात तरतूद नसलेल्या 'त्या' गोष्टीची नायमूर्तींनी घेतली दखल

Ashutosh Masgaunde

Justice Krishnan Ramasamy:

गृहिणी घराचे व्यवस्थापन करते, पतीला कामासाठी घराबाहेर पडता यावे यासाठी तिच्या स्वत: च्या स्वप्नांचा त्याग करते, त्यामुळे कौटुंबिक मालमत्ता कमवण्यात गृहीणीचाही मोलाचा वाटा असतो. आणि म्हणूनच तिच्या पतीने स्वतःच्या नावावर घेतलेल्या सर्व मालमत्तेतील अर्धा वाटा मिळण्यास ती पात्र आहे. असा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने नुकताच दिला.

21 जून रोजी दिलेल्या निकालात, न्यायमूर्ती कृष्णन रामासामी यांनी असे म्हटले की, पत्नीने प्रत्यक्ष तकिंवा अप्रत्यक्षपणे केलेल्या योगदानाला मान्यता देण्यासाठी भारतात आतापर्यंत कोणताही कायदा लागू करण्यात आलेला नाही, परंतु न्यायालय अशा योगदानाला चांगल्या प्रकारे ओळखू शकते.

"कौटुंबिक मालमत्ता निर्माण करण्यासाठी स्त्रीया घरातील कामे करून, त्याद्वारे त्यांच्या पतींना विविध क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी मुक्त सोडतात. याचा त्यांच्या करिअरवरही परिणाम होते. त्यामुळे पतीच्या कमाईत पत्नीचाही तितकाच वाटा असतो. हा एक घटक असेल, ज्याचा हे न्यायालय मालमत्तांमधील हक्काचा निर्णय घेताना विशेषतः विचारात घेईल. जोडीदार जो घराची देखरेख करतो आणि कुटुंबाची काळजी घेतो, त्याला मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क आहे. गृहिणी सतत पती आणि मुलांची काळजी घेते असते, त्यामुळे तिला करिअरचा त्याग करावा लागतो अशात तिला पतीच्या मालमत्तेमध्ये हक्क नाकारणे अन्यायकारक ठरेल.”
मद्रास उच्च न्यायालय

वरील निरिक्षणात, कुटुंबाच्या कल्याणासाठी दोन्ही पती-पत्नींच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संयुक्त योगदानाद्वारे मालमत्ता संपादन केल्यास, दोघांनाही समान वाटा मिळण्याचा हक्क असेल, असे न्यायालयाने अधोरेखित केले.

या कारणांमुळे न्यायाधीशांनी कमसाला अम्मल या महिलेने दाखल केलेल्या अपीलला परवानगी दिली, जिने तिच्या मृत पतीच्या नावावर असलेल्या मालमत्तेत हिस्सा मागितला होता.

उच्च न्यायालयाने पाच मालमत्ता तपासल्या, त्यापैकी दोन तिच्या पतीने सौदी अरेबियात काम करत असताना कमावलेल्या पैशातून तिच्या पतीने विकत घेतले होत्या. दुसरी एक जमीन मृत पतीने अम्मलच्या नावावर विकत घेतली होती. तर काही दागिने बॅंक लॉकरमध्ये ठेवले होते.

अम्मलच्या विरोधात मालमत्तेतील वाट्याचा दावा सुरुवातीला तिच्या पतीने आणि तिच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांनी लढवला होता.

2015 मध्ये, स्थानिक न्यायालयाने वर नमूद केलेल्या पाचपैकी तीन मालमत्ता आणि मालमत्तेमध्ये समान वाटा मिळण्याचा अम्मलचा दावा नाकारला होता.

विवादित मालमत्ता पतीने स्वतःच्या बचतीतून विकत घेतले असले तरी, अम्मालला 50 टक्के वाटा मिळण्याचा हक्क आहे. असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यात पुढे असे म्हटले आहे की दोन बँक लॉकरमधील सोने मृत व्यक्तीने अम्मलसाठी भेटवस्तू म्हणून खरेदी केली होती आणि म्हणून ती फक्त तिच्या मालकीची आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT